दुष्काळाचे रण पेटले...शेतकरी संतापले...मडके फुटले! - Marathi News 24taas.com

दुष्काळाचे रण पेटले...शेतकरी संतापले...मडके फुटले!

www.24taas.com, मुंबई
राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर झालेला असताना, आता या मुदद्यावर रस्त्यावरही रण पेटायला सुरुवात झालीय. राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधाचा हा उद्रेक व्यक्त होऊ लागलाय. मुंबईत मंत्रालयाबाहेर रिपाईतर्फे मटकाफोड आंदोलन करण्यात आलय. तर सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय.
 
 
संतप्त शेतक-यांनी थेट कार्यालयातच घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. तर सोलापूरमध्ये पाण्यावरून रणकंदन पेटलंय. काँग्रेस आमदार दिलीप माने यांनी उजनी धरणाचे पाणी न मिळाल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केलीय. तसंच अधीक्षक आणि अभिंयत्यांना नजरकैदेत ठेवलं. पाणी मिळेपर्यंत अधिका-यांना सोडणार नसल्याची धमकीही माने यांनी दिली होती.
 
 
सोलापूरः अधिकाऱ्यांना कोंडले
सोलापूरमध्ये पाण्यावरून रणकंदन पेटलंय. काँग्रेस आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी आणि अधिका-यांना तब्बल साडेसहा तास कोंडून ठेवलंय.... उजनी धरणाचे पाणी न मिळाल्यानं संतप्त झालेल्या आमदार माने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केलीय.
तसंच अधीक्षक आणि अभिंयत्यांना नजरकैदेत ठेवलं. पाणी मिळेपर्यंत अधिका-यांना सोडणार नाही अशी धमकीही माने यांनी दिलीय. दुपारपासून साडे सहा तासांनंतरही परिस्थिती तशीच आहे. अधिकारी आणि अभियंते राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मर्जीनुसार कामं करतात, त्यामुळे बंधारे बांधतानाही अधिका-यांनी त्या नेत्यांच्या मर्जीनुसार कामं केली असा आरोप माने यांनी केला.. किंबहुना हे अधिकारी राष्ट्रवादीच्या मंत्री आणि नेत्यांच्या शिफारशीनेच इथे बदलून आल्याचा आरोप आमदार दिलीप माने यांनी केला
 
सांगलीः शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले
सांगली जिल्ह्यातला दुष्काळग्रस्त शेतकरी मागण्यासाठी रस्त्यावर उतरलाय. दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीन आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी संतप्त शेतक-यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. आंदोलकांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दूध ओतले. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

First Published: Monday, May 7, 2012, 19:23


comments powered by Disqus