Last Updated: Saturday, May 12, 2012, 16:22
www.24taas.com, मुंबई मुंबईतही पाण्याचा प्रश्न पेटलाय. कुर्ल्यामध्ये पाणीटंचाईमुळे नागरिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका ऑफिसमध्ये तोडफोड केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून या भागात पाणी येत नाहीय. त्यामुळेच चिडलेल्या लोकांनी महापालिकेच्या ऑफिसमध्ये जोरदार तोडफोड केली. पोलिसांनी याप्रकरणी 26 जणांना अटक केलीए. बिल वेळेवर भरूनही या भागात केवळ 5 ते 7 मिनिटं पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली.
कुर्ल्यातल्या या भागात बेकायदेशीर कनेक्शन्सवर कुठलीही कारवाई होत नाही. मात्र बिलं भरूनही आमच्या वाट्याचं पाणी मिळत नाही, असा नागरिकांचा उद्वेग आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना शहरातही पाणी कपातीमुळे नागरिक हैराण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
First Published: Saturday, May 12, 2012, 16:22