लोकलचे डबे घसरल्याने वाहतुकीत झालेले बदल time table change after local train derail

लोकलचे डबे घसरल्याने वाहतुकीत झालेले बदल

लोकलचे डबे घसरल्याने वाहतुकीत झालेले बदल
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलचे ५ डबे टिटवाळा ते आंबिवली दरम्यान निसटले, आणि कल्याण- कसारा, कसारा-मुंबई लोकलसेवा ठप्प झाली. या अपघातात एका ठार, तर तीन प्रवासी जखमी आहेत.

दोन डब्यांमधील जोड तुटल्याने ही लोकल ५ डबे सोडून ४ डबे पुढे निघून गेली, यानंतर चार डबे घसरून या मार्गावरची वाहतूकत ठप्प झाली. तसेच मध्य रेल्वेची दोन्ही बाजुंची वाहतूकही या अपघातामुळं विस्कळीत झालेली आहे.

सेंट्रल रेल्वेच्या लोकल सेवेवरील परिणाम
१) सीएसटी ते ठाणे दरम्यानची लोकल सेवा सुरू
२) कल्याण ते कसारा शटल सेवा सुरू
३) कल्याण स्थानकाहून एसटीकडून जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
४) गैरसोय टाळण्यासाठी ठाणे डेपोतून काही गाड्या मागवण्यात आल्या.

मुंबईहून सुटणाऱ्या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
१) नंदीग्राम एक्सप्रेस,
२) भुसावळ,
३) गोदावरी एक्सप्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.

मनमाड येथून सुटणारी
१) पंचवटी एक्सप्रेस,
२) राज्यराणी एक्सप्रेस,
३) गोदावरी एक्सप्रेस या गाड्या उद्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दौंड आणि वसई मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
१) जनशताब्दी एक्सप्रेस आणि,
२) गुवाहाटी एक्सप्रेस तसेच,
३) तपोवन एक्सप्रेस दौंडमार्गे वळवण्यात आल्या आहेत.
४) हबिबगंज एक्सप्रेस वसई मार्ग वळवण्यात आली आहे.

यासह मनमाडहून निघाणाऱ्या तब्बल १३ गाड्याही दौंड-पुणे मार्गे वळवण्यात आल्या आहेत

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 19:21


comments powered by Disqus