राज्यातील हे २५ टोलनाके बंद होणार, toll plaza : Prithviraj Chavan Raj Thackeray discussion

राज्यातील हे २५ टोलनाके बंद होणार

राज्यातील हे २५ टोलनाके बंद होणार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

खासगीकरणांतर्गत दुपदरी करणाच्या प्रकल्पांची प्रादेशिक विभाग निहाय मार्गावरील राज्यातील आणि एमएसआरडीसीसह राष्ट्रीय महामार्गावरील (नॅशनल हायवे) एकूण २५ टोलनाके बंद होणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलप्रश्न मार्गी लावण्यासाठी आंदोलन हाती घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. यावेळी हे टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय.

प्रादेशिक विभाग निहाय टोलनाके

अमरावती (एक)
वाशिम जिल्हा - कारंजा मंगरूळपीर वाशिम राज्य मार्ग २०९

औरंगाबाद (पाच)
चुंबळीफाटा-पाटोदा-मांजरसुंबा
तुळजापूर-उजनी
औंढा-चाँढी-वसमत (आसना नदीवरील पुल पुनर्बांधनीसह)
तुळजापूर-नळदूर्ग
अहमदनगर-आष्टी-जामखेड

नाशिक (पाच)
चांदवड मनमाड नांदगाव
औरंगाबाद दोंडाईचा शहादा रस्ता
अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्यावरील खानापूर गावा जवळील
धुळे बायपास
काठरे दिंगर सटाणा - मालेगाव चाळीसगाव

पुणे (सहा)
पुणे पौंड - पिरंगुट, मुठा रस्ता ता. मुळशी
टाकळी - कासेगाव - अनवली रस्ता जिल्हा मार्ग
पंढरपूर-मोहोळ रस्ता राज्य मार्ग.
अक्कलकोट मैदर्गी निंबाल रस्ता राज्य मार्ग
मंगळवेढा बाह्यवळण, मंगळवेढा ते मरवडे, बेगमपूर ते मंगळवेढा व मरवडे ते कात्राळ रस्ता
बार्शी सोलापूर राज्य मार्ग (भोगावती नदीवर काळेगाव पुल)

मुंबई (एक)
रायगड जिल्ह्यातील दांड तुराडे आपटा खारपाडा रस्ता राज्यमार्ग
(प्रकल्प किंमत १३८.४० कोटी, परतावा रक्कम ९०.१० कोटी)

राज्यातील १८ तर एमएसआरडीसीचे ३ आणि नॅशलन हायवेचे ४ असे एकूण २५ टोलनाके बंद होणार आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 13, 2014, 13:28


comments powered by Disqus