राज ठाकरे - मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आज चर्चा , today discussion between Raj Thackeray & CM

राज ठाकरे - मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आज चर्चा

राज ठाकरे - मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आज चर्चा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

टोल प्रश्नावर आज सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत. काही मोजक्या संपादकांसह ही चर्चा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत टोलप्रश्नावर काय तोडगा निघतो का याकडे लक्ष लागलंय. ज्या टोल नाक्यांवर टोल वसुली पूर्ण झालीय ते टोल नाके सरकार बंद करणार का तसंच टोल धोरणासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

मनसे १२ तारखेला काय करणार, याची ज्या पद्धतीनं हाईप करण्यात आली. त्यामुळे या रास्तारोकोची प्रचंड उत्सुकता होती. त्यातच हे आंदोलन खणखणीत करणार, असं मनसेप्रमुखांनी मंगळवारी जाहीर केलं होतं. पण बुधवारी अवघ्या सहा तासांत हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि २ तारखेपासून सुरू झालेले हे नाट्यप्रयोग संपले.

टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या 360 मिनिटांत संपलं... मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी 180 डिग्रीत यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं, असा सवाल उपस्थित केला जातोय...
राज यांनी टोलच्या मुद्द्यावर आंदोलन केलं. यातून काय साध्य झालं असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. सर्वसामान्य माणसाला टोलचा त्रास होतोच आहे. मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचे काही प्रश्न सर्वसामान्यांचे आहेत. त्याकडे राज ठाकरे आणि मनसे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होतोय.आम्ही राज ठाकरेंना आणि त्यांच्यासारख्या नेत्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रश्नांकडेही बघावं.

राज ठाकरे यांच्या टोलविरोधातल्या आंदोलनावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केलीय... राज ठाकरेंना आपण चर्चा करण्यासाठी वेळ दिला होता तरी आंदोलन करण्याची गरज काय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय तर काही राजकीय पक्ष जनेची दिशाभूल करत आहेत असा टोला अजित पवारांनी मनसेला लगावलाय. तर निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आंदोलनाचं नाटक करत असल्याचा टोला भुजबळांनी लगावलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 13, 2014, 08:19


comments powered by Disqus