Last Updated: Saturday, October 19, 2013, 08:31
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईमनोहर जोशींच्या पत्रावर बोलण्याची गरज नाही, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगून जोशींच्या नाराजीवर उद्धव यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
मनोहर जोशी... या विषयावर बोलण्याची ही वेळ नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उद्धव ठाकरे काल वानखेडे स्टेडियमवर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. एमसीएच्या अध्यक्षपदावरून उभा राहिलेला वाद दुर्दैवी असून खेळाच्या मैदानाचा राजकीय आखाडा करू नका, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. क्रिकेटमध्ये राजकारण असता कामा नये असे ते म्हणाले.
मी कोणतीही चूक केलेली नाही, त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच नाही, मी ४५ वर्ष शिवसेनेची सेवा केलीय त्यामुळे शिवसेना सोडायचा प्रश्नच नाही असं मनोहर जोशी यांनी काल स्पष्ट केलं होतं. दसरा मेळाव्यात झालेल्या प्रकारानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे अज्ञातवासात गेले होते. सर कुठे आहेत याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र आता जोशी मुंबईत परतलेत.
जोशी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र या पत्रात काय आहे याचा तपशील उघड करण्यास त्यांनी नकार दिलाय. दरम्यान मनोहर जोशींनी हे वक्तव्य नैराश्यातून केलं असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलंय. मनोहर जोशींचं वक्तव्य त्यांच्या अंगलट आल्यंचं ते म्हणालेत. मनोहर जोशींनी शिवसेनेतच रहावं असं आवाहन त्यांनी मनोहर जोशींना केलं आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, October 19, 2013, 08:19