Last Updated: Tuesday, October 15, 2013, 19:51
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई शिवसेनेमध्ये मनोहर जोशींचा अपमान झाल्यानंतर कधीकाळी त्यांचे सहकारी म्हणून वावरलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनीदेखील जोशींवर तोंडसुख घेतलंय. प्रत्येक पद आपल्यालाच मिळावं, हा जोशींचा पहिल्यापासून हव्यास होता. नियतीनं जोशींवर सुड उगवलाय, असा भडीमार भुजबळांनी जोशींवर केलाय.
बाळासाहेब गेल्यानंतर हे पहिलंच वर्ष... आणि पहिल्याच वर्षी बाळासाहेबांनी ज्या व्यक्तीला पक्षात दामदुप्पट दिलं... त्या नेत्याचा हव्यास अजून काही संपत नाही... आणि म्हणून गेल्या काही दिवसांत ज्या काही घटना घडल्या त्यामुळे शिवसैनिकांची दसरा मेळाव्यातील प्रतिक्रिया स्वाभाविक होती. शिवसैनिकांचा सुरूवातीपासून त्यांच्यावर राग होता. केवळ बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली ते सगळं लपून जात होतं’ अशा शब्दांत भुजबळांनी तोफ डागलीय.
नियतीनंच सूड उगवलाय... आपल्यापेक्षा कुणीही मोठं होऊ नये, सगळी पदं माझ्यासाठीच असली पाहिजेत... मग, वामनराव महाडिक असू देत किंवा छगन भुजबळ किंवा त्यांचा भाचा सुधीर जोशी असू देत... या सगळ्यांच्या बाबतीत अंतर्गत राजकारण करण्याचंच काम त्यांनी केलं. दुसऱ्या पक्षातील लोकांपेक्षा त्यांच्याच पक्षातील लोकांना त्यांचा जास्त त्रास झालाय’ अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आपली खुन्नस व्यक्त केलीय.
‘बाळासाहेबांच्या निधनानंतर थोराची भूमिका त्यांनी घ्यायला हवी होती आणि उद्धवपासून सगळ्यांनाच मार्गदर्शन करायला हवं होतं... पण त्याऐवजी ते ज्यापद्धतीनं वागले त्याचा हाच शेवट होणार होता’ अशी जहरी टीका भुजबळांनी मनोहर जोशींवर केलीय.
ऐका... काय म्हणाले छगन भुजबळ... त्यांच्याच शब्दात... *
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, October 15, 2013, 19:51