Last Updated: Thursday, April 11, 2013, 23:35
www.24taas.com, मुंबईअजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवारांना झोप कशी लागली असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.
भास्कर जाधवांच्या मुलांच्या राजेशाही लग्नानंतर पवारांना झोप लागली नव्हती. आता अजित पवारांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या झोपेचं काय झालं असा टोलाही त्यांनी लगावलाय. शरद पवार अजून या प्रकरणावर काहीच का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
तर दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर तोफ डागलीय. यांना बाबा-दादा आणि आबा म्हणावं एवढी यांची लायकी आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
First Published: Thursday, April 11, 2013, 23:35