Last Updated: Wednesday, April 10, 2013, 11:18
www.24taas.com, मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मनसे कार्येकर्ते रस्त्यावर आलेत. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईत मनसेचं आंदोलन सुरू झालंय. यावेळी या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.
उपमुख्यमंत्री आजीत पवार यांनी दुष्काळग्रस्तांबाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानाचे विधिमंडळात पडसाद उमटत असतानाच मनसेने पवारांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर संघर्ष सुरू केलाय. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यानी मनसे कार्यकर्त्याना राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश दिलेत. मुंबईत आज भारतमाताच्या परिससरात मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
महाराष्ट्राच्या विविध भागातही माणसेचे कार्यकर्ते आज आंदोलन करणार आहेत. शिवसेनेनं अजितदादांविरोधात १२ एप्रिलला एकत्र आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, त्याआधीच मनसेनं आंदोलनात आघाडी घेतलीय.
First Published: Wednesday, April 10, 2013, 11:18