Last Updated: Wednesday, April 17, 2013, 18:32
www.24taas.com,मुंबईठाण्यात मुंब्रा परिसरातील शिळफाट्यामध्ये सात मजली इमारत कोसळली. या अनधिकृत इमारतीला जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर आधी कारवाई झालीच पाहिजे. बिल्डर सोडून सर्वांवर कारवाई केली जात आहे. लागेबंधमुळे बिल्डर मोकाट आहे. हे बिल्डर उत्तर प्रदेशातील आहेत, त्यांच्यावर आधी कारवाई करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
अनिकृत बांधकामात मनसेच्या नेत्याचा तसेच नगरसेवकांचा समावेश असेल तर त्यांच्यावरही कारवाई करा. मतांसाठी अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन मिळत आहे. ठाण्यातील बंदमागे राजकारण केले जात आहे. अनधिकृत बांधकामाला आपण थारा देत नाही. त्यामुळे या ठाणे बंदला मनसेचा पाठिंबा राहणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
Breaking News
-अनधिकृत बांधकामे पाडलीच पाहिजेत.
-नगरसेवक आणि बिल्डर यांचे लागेबंध असतात, त्यामुळेच अनधिकृत बांधकामे.
-प्रत्येकवेळी पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई का? नगरसेवक, आमदारांवर का होत नाही कारवाई?
-अनधिकृत बांधकामाना अधिकृत करायचे असेल तर मुंबईतील आदर्श बिल्डींगचे पैसे भरून अधिकृत करा
-बंद करण्यापेक्षा अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरना अटक करा.
-अनधिकृत बांधकामाला बिलकुल थारा देता कामा नये.
-ठाण्यातील अनधिकृत बांधकामाबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार.
-ठाण्यातील जनतेने अनधिकृत बांधकामाबाबत बंदला बळी पडू नका.
-ठाण्यातील अनधिकृत बांधकामाबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार.
-ठाण्यातील जनतेने अनधिकृत बांधकामाबाबत बंदला बळी पडू नका.
-ठाण्यातील उद्याच्या बंदला राज ठाकरेंचा पाठिंबा नाही
-अनधिकृत बांधकाम प्रोत्साहन देणारे माझे नगरसेवक असतील त्यांच्यावर कारवाई करावी.
-अनधिकृत बांधकाम प्रोत्साहन मी देणार नाही.
-ज्या भागात किंवा परिसरात अनधिकृत बिल्डींग बांधतात त्यांच्यावर कारवाई होण्याबाबत विधानसभेत का ठराव होत नाही?
-अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना कोणी मदत केली, त्यांच्यावर कारवाई का होत नाही?
-अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना का दोषी ठरवलं जात नाही.
-अनधिकृत बांधकामुळे अधिकृत लोकांवर एक ठपका पडतोय
-मुब्र्यातील कोसळलेली इमारत कोणी बांधली होती, याला जबाबदार कोण? त्याची चौकशी का होत नाही.
-ठाण्यात शिळफाट्यामध्ये सात मजली इमारत कोसळली, त्यात जे गेलेत ती दुर्दैवी घटना आहे.
First Published: Wednesday, April 17, 2013, 18:18