ठाणे बंदला मनसेचा पाठिंबा नाही - राज ठाकरे

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 19:14

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईविरोधात उद्याच्या ठाणे बंदला मनसेचा पाठिंबा नसल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. अनधिकृत बांधकाम करणा-या बिल्डरांना स्थानिक नगरसेवक आमदारांचा पाठिंबा असल्याची टीका राज यांनी केलीय.

राज ठाकरे अनधिकृत बांधकामाबाबत काय बोलले?

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 18:32

ठाण्यात मुंब्रा परिसरातील शिळफाट्यामध्ये सात मजली इमारत कोसळली. या अनधिकृत इमारतीला जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर आधी कारवाई झालीच पाहिजे. बिल्डलरा सोडून सर्वांवर कारवाई केली जात आहे. लागेबंधमुळे बिल्डर मोकाट आहे. हे बिल्डर उत्तर प्रदेशातील आहेत, त्यांच्यावर आधी कारवाई करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.