Last Updated: Tuesday, April 29, 2014, 19:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईकरांना यंदा पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे, कारण हवामान विभागाने यंदा पर्जन्यमान कमी असल्याचं सांगितलं आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानंतर पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मुंबईकरांना केलं आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 95 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिका आता कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय.
जर यंदा पावसानं दडी मारली तर २०१० नंतर पहिल्यांदा मुंबईकरांवर पाणी कपातीचं सावट येणार आहे. `एल निनो` सक्रिय होण्याची शक्यता वर्तवल्याने, यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 29, 2014, 19:26