१६ वर्षीय विद्यार्थिनीला रस्त्यात विष पाजले, 16-year-old student on route given poison

१६ वर्षीय विद्यार्थिनीला रस्त्यात विष पाजले

१६ वर्षीय विद्यार्थिनीला रस्त्यात विष पाजले
www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर

संगणक शिकवणी आटोपून घरी जाणा-या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीला एका माथेफिरू युवकाने भर रस्त्यात विष पाजल्याची घटना घडली. चंद्रपुरातील ही घटना आहे. या विद्यार्थिनीवर पाळत ठेऊन या युवकाने हे कृत्य केलंय.

ही पिडीत विद्यार्थिनी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे तर आरोपी युवकाला पोलिसानी ताब्यात घेतले आहे. पिडीत मुलगी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यानं बल्लारपूर शहरात मुळ घरी आली होती. काही दिवसांपूर्वीही संबंधीत युवकानं मुलीची छेड काढली होती.

कुटुंबियांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी समज देऊन त्याची सुटका केली होती. मात्र त्यानंतर संतापललेल्या आरोपीनं संधी साधत पुन्हा तरुणीला गाठत विष पाजण्याचा प्रयत्न केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 1, 2014, 21:08


comments powered by Disqus