जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 22:28

ऐतिहासिक जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेनंतर आता विधान परिषदेतही मंजूर झालंय.. अशा प्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे.

जादूटोणा विरोधी विधेयक रखडलं, नव्याने तरतूदी

Last Updated: Friday, December 13, 2013, 08:16

जादूटोणा विरोधी विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं. पण हे विधेयक आजचा किंवा किंवा सोमवारी संमत होण्याची शक्यता आहे. विधानसभेत ओल्या दुष्काळावर सुरू असलेली चर्चा लांबल्याने जादूटोणा विरोधी विधेयकावर परवा सुरू झालेली चर्चा काल झालीच नाही. त्यामुळे हे विधेयक रखडलं.

जादूटोणा विरोधी विधेयकाचा आग्रह धरणारे दलाल- दिवाकर रावते

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 15:25

जादूटोणा विरोधी विधेयकाचा आग्रह धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी `दलाल` अशी संभावना केलीय... संसदीय मार्गानं विधेयकाला विरोध करता करता रावतेंची जीभ घसरल्याचं दिसतंय.

‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’

Last Updated: Thursday, August 22, 2013, 12:17

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्येचे पडसाद दिल्लीतही उमटले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दिल्लीतील अनेक वैज्ञानीक एकत्र आले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. ‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’, अशी त्यांनी मागणी केली.

सरकारचा जादूटोणा, सेना- मनसेची सावध भूमिका

Last Updated: Thursday, August 22, 2013, 10:17

समाजातील अंधश्रद्धेविरूद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. गेल्या १८वर्षांपासून रखडलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. वटहुकूमाला वारक-यांनी विरोध दर्शवलाय, तर शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.