Last Updated: Wednesday, February 20, 2013, 13:01
www.24taas.com, भंडारा
भंडाऱ्यामधल्या तीन अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या मुरमाडी गावात एकाच कुटुंबातल्या तीन सख्या बहिणींची बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती.
१४ फेब्रुवारीला या तीन बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी गावाजवळ असलेल्या ढाब्यानजीकच्या एका विहिरीत या तीन बहिणींचे मृतदेह सापडले होते. या मुलींवर बलात्कार झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांस १० लाखांची मदत जाहीर केली आहे.देशाला हादरवून सोडणारी घृणास्पद घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात घडली.
एकाच कुटुंबातल्या तीन सख्या बहिणींची बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली. या तिघीही अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. या मुलींवर बलात्कार झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागातील मुलीही सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा दिसून आलं
First Published: Wednesday, February 20, 2013, 12:54