बलात्कार करून तिघी बहिणींची हत्या, Rape on three sister, and then murder

भंडाऱ्यात तीन बहिणींवर बलात्कार करून हत्या

भंडाऱ्यात तीन बहिणींवर बलात्कार करून हत्या
www.24taas.com, भंडारा

देशाला हादरवून सोडणारी घृणास्पद घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात घडली. भंडारा जिल्ह्यातल्या मुरमाडी गावात एकाच कुटुंबातल्या तीन सख्या बहिणींची बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली.

या तिघीही अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. १४ फेब्रुवारीला या मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी गावाजवळ असलेल्या ढाब्यानजीकच्या एका विहिरीत या तीन बहिणींचे मृतदेह सापडले होते.

या मुलींवर बलात्कार झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागातील मुलीही सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा दिसून आलं

First Published: Wednesday, February 20, 2013, 11:33


comments powered by Disqus