Last Updated: Thursday, February 21, 2013, 12:43
www.24taas.com, भंडाराभंडाऱ्यामधल्या तीन अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणानं नवं वळण घेतलं आहे. या मुलींच्या आईनं आपली सासू, सासरे यांच्यावरच आपल्या मुलींच्या हत्येचा आरोप केला आहे.
या प्रकरणी लाखनी पोलिसांनी रात्री या दोघांना चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. या अगोदरही आपल्या सासूनं मुलींवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता, असाही त्यांचा आरोप आहे...
१४ फेब्रुवारीला बेपत्ता झालेल्या बहिणींचे मृतदेह दोन दिवसांनी गावाजवळ एका विहिरीत सापडले होते. एका विहिरीत या तीन बहिणींचे मृतदेह सापडले होते. या मुलींवर बलात्कार झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांस १० लाखांची मदत जाहीर केली आहे.
First Published: Thursday, February 21, 2013, 12:30