चंद्रपूरमध्ये पावसाचे संकट, ४ बळी, Chandrapur in rain

चंद्रपूरमध्ये पावसाचे संकट, ४ बळी

चंद्रपूरमध्ये पावसाचे संकट, ४ बळी
www.24taas.com, झी मीडिया,चंद्रपूर

चंद्रपुरात मुसळधार पावसाचे चार बळी गेलेत. दिवसभर सुरु असलेल्या पावसाचा फटका औष्णिक विद्युत केंद्रालाही बसला असून या केंद्रात सर्वत्र पाणी शिरल्यानं वीज निर्मिती ठप्प झालीय. इतिहासात पहिल्यांदात वीज निर्मिती बंद होण्याची घटना घडलीय. तर मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी लोक पुरात अडकलेत. शहर सध्या एक मोठे बेट झालंय. चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे चंद्रपूर शहराचा पूरग्रस्त भागाचा दौरा करताना अचानक शहरातील पुराच्या पाण्यात सापडले. पालकमंत्र्यांना चंद्रपूरच्या पुराचा फटका बसला. त्यांना आपल्या ताफ्यासह पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, जि. प. CEO, मनपा आयुक्त यांच्यासह एका ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. दुसरीकडे चंद्रपूरच्या बाबूपेठ Enrich इंग्लिश मिडीयम शाळेच्या १०० पेक्षा जास्त चिमुकल्यांना आपत्ती निवारण पथकाने बोटीच्या सहायाने सुरक्षित बाहेर काढले.

केवळ चंद्रपूर नाही तर संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. नागपुरमध्ये शुक्रवार पासून दमदार पाऊस सुरु आहे. अकोला जिल्ह्यातल्या वाण धरणाचे ४, तर यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती धरणाचे सर्व ११ आणि धरणाचे ५ दरवाजे उघडले आहेत. वैनगंगा, झरपट, इरई नदींनी धोक्याची असून, नदीचे पाणी वस्त्यांमध्ये घुसले आहे.

बंगालच्या खाडीत आणि उतार प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या ४८ तासात मुसळधार ते अति मुसळधार पाउस पडण्याचा इशारा वेध शाळेने दिला आहे. दरम्यान मुसळधार पावसाचा फटका रेल्वेसेवेलाही बसलाय. पावसामुळे तुळजापूर येथे रेल्वेरूळाखालील माती, खडी वाहून गेलीय.

नागपुरात रेल्वेच्या चारही मार्गावरील वहातूक ठप्प झालीये. काही गाड्या दुस-या मार्गाने वळवण्यात आल्यात तर काही गाड्या रद्द करण्यात आल्यात यात मुंबई-नागपूर दुरान्तो एक्प्रेस, सेवाग्राम एक्प्रेस आणि राजधानी एक्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. अचानक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल होताहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 20, 2013, 10:22


comments powered by Disqus