Last Updated: Monday, September 16, 2013, 10:54
www.24taas.com, झी मीडिया, अकोलाअकोल्याजवळील पारस इथं रेल्वे रुळ खचल्यानं नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसामुळं रुळ खचलाय. त्यामुळं नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या विस्कळीत झाल्या असून एकाच रुळावरून वाहतूक सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहर आणि परिसरात काल मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळं पारसजवळील रेल्वेमार्गावर आलेल्या पाण्याने रुळाखालील स्लीपर आणि खडी वाहून गेली. त्यामुळं अनेक गाड्या थांबविण्यात आला असून, काही गाड्या वेगळ्या मार्गानं वळविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, रेल्वे स्लीपर टाकण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय. मात्र असं असलंतरी हे काम पूर्ण होण्यासाठी दुपारचे एक वाजण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात येतेय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, September 16, 2013, 10:53