...जेव्हा दारुच्या ठेक्यावर मगरीनं दिली धडक!

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 16:34

मेरठच्या देवल गावात दारुच्या ठेक्यावर मंगळवारी सकाळीच एक अनपेक्षित पाहुणा येऊन धडकला... आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच धाबे दणाणले... कारण, हा पाहुणा होता एक भली मोठी मगर...

राज ठाकरेंचं दुबईतल्या मॉल प्रकरणी भुजबळांना उत्तर

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 16:43

माझा दुबईत काय, जगात कुठेही शॉपिंग मॉल असेल, तर तो मी छगन भुजबळ फाऊंडेशनला मोफत देऊन टाकेन, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं आहे.

अमरातीमध्ये कपडा दुकानाला आग, ७ जणांचा मृत्यू

Last Updated: Sunday, March 30, 2014, 16:04

अमरावतीमध्ये एका कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत कोतवाल कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. अमरावतीतील परतवाडा रोड इथल्या टिळकचौकातील ही घटना आहे.

दिवस प्रेमाचा...द्या शुभेच्छा

Last Updated: Friday, February 14, 2014, 09:38

आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आनंदाचा आणि उत्साहाचा व्हॅलेंटाईन डे. कॉलेजमधील तरुण-तरुणींचा, मित्र-मैत्रिणांचा आणि आपले नाते अधिक दृढ करण्याचा आणि प्रेमाचा दिवस. या दिवशी तुम्ही द्या तुमच्या खास शुभेच्छा आपल्या आवडत्या व्यक्तीला.

व्हॅलेंटाईन डेचा आनंद, गिफ्ट शॉपीज..मॉल्समध्ये तरुणाई

Last Updated: Friday, February 14, 2014, 08:40

दरवर्षी व्हॅलेंनटाईन डे ला कँफेज..गिफ्ट शॉपीज..मॉल्स..येथे तरुणांची झुंबड दिसुन येते...गिफ्ट विक्रेते आणि कॉफी शॉपही तरुणांच्या उत्साहात भर घालण्यासाठी विशेष प्रयत्न करतात...आता मात्र या तरुणाईच्या उत्साहात भर टाकण्यासाठी अँड्रॉइजने ही व्हँलेंनटाईन डे नावाने अँप विकसित केलंय. तर महाराष्ट्र सरकारच्या व्यसनमुक्ती अभियानाचा ब्रँड एम्बॅस्डर अभिनेता सिद्धार्थ जाधावने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी निर्व्यसनी जोडीदार निवडण्याचा सल्ला दिलाय.

सोने दर घसरूनही खरेदीकडे ग्राहकांची पाठ

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 13:59

देशात सोने किमतीत घट झाली तरीही सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत सोने किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याची अनेक कारणे दिसून येत आहेत.

विक्रम गोखले, नाना पाटेकर,रिमा यांना घडविणाऱ्यांची मुंबईत कार्यशाळा

Last Updated: Saturday, January 11, 2014, 23:55

अनेक दिग्गज कलाकारांना ज्यांनी घडवलं. मराठी रंगभूमीवरचवर ज्यांचं एक वेगळंच स्थान आहे, अशा विजया मेहता खास आपल्या विद्यार्थांसाठी पुन्हा एकदा कार्यशाळा आयोजित करणार आहे.

पवारांच्या बारामतीत दारूची दुकाने, बंदसाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 15:25

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या बारामतीत २२ गावांनी पाण्यासाठी आंदोलन केल्यानंतर आता बारामती तालुक्यातील तमाम जनता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येतेय. बारामती तालुक्यातील शिर्सुफळमध्ये दारूबंदीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, ग्रामस्थ नवीन वर्षाच्या स्वागतालाच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण बारामतीचं याकडे लक्ष लागलं आहे.

शॉपिंगसाठी ‘डेबिट कार्ड’ वापरताय? आता, पीनकोडची गरज...

Last Updated: Monday, December 2, 2013, 10:45

डेबिट कार्ड हरवलं किंवा चोरी झालं तर तुमच्याच खात्यातील पैसे तुमच्या परवानगीशिवाय शॉपिंगवर उडवण्याच्या घटना काही नवीन नाहीत.

चेन्नईत बंगळूर स्टाइल ATM हल्ला, महिलेची लूट

Last Updated: Monday, November 25, 2013, 09:06

बंगळूरमध्ये एटीएममध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला होण्याची घटनेला काही दिवस उलटत नाही तोच चेन्नईमध्येही अशीची घटना घडली आहे. रेशनच्या दुकानात काम करणार्‍या एका महिलेवर हल्ला करून सोन्याची चेन आणि १५ हजार रुपये दोन चोरट्यांनी पळविले.

अमेरिकेत मॉलमध्ये पुन्हा गोळीबार...

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 13:57

उत्तर न्यूजर्सी स्थित एक मॉल रात्री बंद होण्याच्या अगदी थोड्यावेळ अगोदर या ठिकाणी गोळीबार झाला. त्यानंतर पोलीस या ठिकाणी या बंदूकधारी गोळीबार करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

खासदारांच्या कार्यालयाजवळील दारू अड्डा उद्ध्वस्थ

Last Updated: Monday, October 28, 2013, 14:32

औरंगाबादमध्ये मछली खडक भागात संतप्त नागरिकांनी दारु अड्डा उद्ध्वस्थ केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मछली खडक भागात हे देशी दारूचं दुकान सुरूय. त्यामुळं दारुडे दारू पिऊन धिंगाणा घालतात त्याचप्रमाणं दारू पिऊन येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांची छेड दारुडे काढतात.

ऑनलाइन शॉपिंग करण्याआधी हे आधी वाचा?

Last Updated: Friday, October 25, 2013, 15:20

आजकाल इंटरनेटमुळे अनेक व्यवहार करणे सुलभ झाले आहेत. मात्र, जरी ही सुलभता असली तरी अनेक धोके आहेत. तुमची याच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

मी ऑनलाईन खरेदीसाठी लालची आहे - करीना कपूर

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 16:02

`मैं अपनी फेव्हरेट हूँ...` म्हणणाऱ्या करीनानं आता स्वत:बद्दल आणखी एक रहस्य उघड केलंय. घरात आरामात बसलेली असताना मी ऑनलाईन खरेदी करते, तेव्हा गरजेपेक्षा जास्तच वस्तूंची खरेदी माझ्याकडून होते, असं करीनानं म्हटलंय.

मुंबईत २४ तास सुरू राहाणार हॉटेल्स?

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 19:21

न्यूयॉर्कच्या धर्तीवर आता मुंबईतही रात्रभर दुकानं आणि हॉटेल्स खुली राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या कायदा समितीनं त्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवलाय. त्यावर आता विचार सुरू आहे.

केनियाची राजधानी नैरोबीत मॉलवर हल्ला, ३९ ठार

Last Updated: Sunday, September 22, 2013, 08:38

केनियाची राजधानी नैरोबीमधील वेस्टगेट मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधूंद गोळीबार केलाय. हल्ल्याच्यावेळी हल्लेखोरांनी ग्रॅनाईड फेकल्याची माहितीही उघड झालीये. या हल्ल्यात 39 जण ठार झाल्याची माहिती केनियातील रेडक्रॉसचे अधिकारी अब्बास गुलेत यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातही ‘ऑनलाईन शॉपिंग’ची क्रेझ!

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 15:52

राज्यात सध्या ग्रामीण महाराष्ट्रात ऑनलाईन शॉपिगची क्रेझ वाढतेय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका यात अग्रेसर असून जळगाव जिल्ह्यातही क्रेझ वाढताना दिसून आलीय.

पारंपरिक दागिन्यांची सर कशालाच नाही!

Last Updated: Monday, August 5, 2013, 12:00

‘चपलाहार, मोहनमाळ, चंद्रहार आणि नाकातील चापाची नथ हे माझे आवडते दागिने... पण खरं सांगू का, माझ्या सासूबाईंनी मला दिलेल्या पाटल्यांची सर कशालाच नाही हं!’... धक धक गर्ल माधुरी नेन्यांचं कौतुक करत होती.

बार-दारूची दुकाने बंद होणार

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 15:56

महामार्गाजवळील (हायवे लगत) असलेले बार आणि दारूची दुकानं बंद होणार आहेत. उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली.

धोनी, सचिनसह आठ क्रिकेटपटूंवर गुन्हा

Last Updated: Saturday, June 15, 2013, 19:27

सहारा क्यू शॉपचे उत्पादन असलेले मोहरीचे तेल भेसळयुक्त आढळल्याने खाद्य सुरक्षा विभागाने या क्यू शॉपचे सर्वेसर्वा सुब्रतो राय आणि आठ क्रिकेटपटू व दोन चित्रपट अभिनेत्यांसह १६ जणांवर गुन्हा दाखल केला.

व्यापाऱ्यांना लावणार एस्मा, सरकार आक्रमक

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 12:47

दुकाने बंद ठेवून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांवर आपले दुकान बंदचे आंदोलन मागे घ्यावे लागेल अन्य़था कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. एस्मा लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात.

आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेचा हिसका

Last Updated: Sunday, May 12, 2013, 08:42

एलबीटीविरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेनं हिसका दाखवण्यास सुरुवात केलीय. मनसे कार्यकर्त्यांच्या संरक्षणात व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं आता एलबीटीबाबत व्यापाऱ्यांची भूमिका मवाळ झाल्याचे संकेत मिळतायत.

रात्रभर... पिओ अन् नाचो...

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 11:10

ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी राज्यातील वाईन - दारुची दुकानं रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहेत तर परमिट रुम आणि क्लब सकाळी पाचवाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

ऑनलाईन शॉपिंग, ऑफर डिस्काऊंटची

Last Updated: Monday, December 10, 2012, 13:08

ग्राहकांसाठी मेगा खरेदी करण्याची ऑनलाईन संधी मिळणार आहे. ही १२ डिसेंबरपासून मिळू शकेल. ऑनलाईन शॉपिंगचा महाकुंभ मेळावा होत आहे. यामध्ये ५० पेक्षा जास्त वेबसाइट्स सहभागी झाल्या आहेत. रिटेल कंपन्यांनी खरेदीवर डिस्काऊंटची ऑफर लागू केली आहे.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये सापडली 'हिटलर'ची मर्सिडिज

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 11:14

इंटरनेटवर ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या चिक्कार आहे. पण न्यू जर्सी मधल्या एका ऑटो डीलरला विंटेज कार विकत घेताना आश्चर्याचा धक्का बसला.

पुण्यात ज्वेलर शॉप लुटण्याचा प्रयत्न

Last Updated: Friday, May 11, 2012, 22:57

पुण्यात हडपसरमधील ओंकार ज्वेलर्सवर दरोडा घालण्याचा प्रयत्न झाला. गोळीबार करून दरोडा घालण्याचा 2 जणांनी प्रयत्न केला. मात्र दुकानाचे मालक आणि परिसरातल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळं हा दरोड्याचा प्रयत्न फसला. सुदैवानं गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही.

सोनाराच्या दुकानात फिल्म स्टाईल चोरी

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 20:34

पुण्यातील हडपसर परिसरात एक अजब चोरी घडलीय. एक चोर ग्राहक बनून सोन्याच्या पेढीवर आला. आणि त्यानं काही कळायच्या आतच दुकानातल्या सोनसाखळ्या लांबवल्या. चोर फरार झाला असला, तरी सी.सी.टी.वी. कॅमे-यात मात्र त्याची ही फिल्मीस्टाईल चोरी कैद झाली.

उपकर चुकवल्याबद्दल वाईन शॉप सील

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 14:15

उपकर चुकवल्याप्रकरणी नवीमुंबई महापालिकेने मद्य दुकानावर सील ठोकण्याची कारवाई केली आहे. वाशी मधल्या सोनी वाईन्स या दुकानानं महापालिकेचा जवळपास तेहतीस लाख रुपयांचा उपकर थकवला होता.

शॉपिंग बॅगही बिघडवू शकते मनःस्वास्थ्य!

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 21:50

जड शॉपिंग बॅगांइतकी साधी गोष्टही आपला मानसिक तणाव वाढवू शकते. नुकत्याच एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. हातातील भौतिक वजन माणसाच्या मनःस्वास्थ्यावर परिणाम करत असते.

सराफाच्या दुकानात वॉचमननेच केली चोरी

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 13:31

मुंबईतल्या झवेरी बाजारातील एका सराफ दुकानातून तब्बल ५० लाखांचे दागिने चोरण्यात आलेत. ही चोरी सराईत चोरांनी केली नव्हती, तर त्या दुकानाची रखवालदारी कऱण्याची ज्याच्यावर जबाबदारी तोच रखवालदार चोर निघाला.

जळगावात बंदला हिंसक वळण

Last Updated: Thursday, December 15, 2011, 06:49

सरकारच्या शेतकऱ्यांविषयी असणाऱ्या दुटप्पी धोरणाला विरोध करण्यासाठी आज विदर्भासह, खान्देशात आणि मराठवाड्यात बंद पुकारण्यात आला. पण जळगावमध्ये काही ठिकाणी अनेक दुकाने सुरू असल्याचे शिवसैनिंकाना समजले असता त्यांनी जळगाव मधील फुले मार्केटमधील दुकाने बंद करण्यासाठी या दुकानांवर दगडफेक केली

निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पर्दाफाश

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 14:12

वसईच्या तामतलाव परिसरात रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवलं जात असल्याचा पर्दाफाश झी 24 तासनं केला होता. त्यानंतर संतप्त महिलांनी या दुकानावर हल्लाबोल केला . त्यानंतर संतापलेल्या दि पिपल्स मध्यवर्ती सहकारी भांडाराच्या पदाधिकाऱ्यांनी पुरवठा निरीक्षकांनाच घेराव घातला.

टोल नाक्यांवर थाटली वसुलीची दुकाने

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:25

रस्ते आणि पूल बांधणी करण्यासाठी राज्य सरकारने बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा (बीओटी) योजना आणली आणि राज्यातील नाक्यानाक्यांवर टोलच्या नावाखाली वसुलीची दुकानेच थाटली आहेत.