जळगाव महापालिका : मतमोजणी सुरू , jalgaon municipal corporation election

जळगाव महापालिका : मतमोजणी सुरू

जळगाव महापालिका : मतमोजणी सुरू
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतमोजणी सुरू झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, तसंच खान्देश विकास आघाडीने यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावलीय.

या निवडणुकीत घरकूल घोटाळ्यात अटकेत असलेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन, विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे तसेच माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीची व्यवस्था करण्यात आलीय. सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एकूण सात कक्ष मतमोजणीसाठी तयार करण्यात आलेत. प्रत्येक टेबलवर ४ याप्रमाणे ८८ कर्मचारी सध्या मतमोजणीची प्रक्रिया पार पाडतेय. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वच्या सर्व ७५ जागांचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सुमारे ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

२००८ च्या निवडणुकीतील बलाबल पाहूया...
खानदेश विकास आघाडी : ३२
राष्ट्रवादी काँग्रेस : १४
भाजपा : ९
शहर विकास आघाडी : ८
महानगर विकास आघाडी : १
शिवसेना : १
मनसे : १
अपक्ष ३

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, September 2, 2013, 11:14


comments powered by Disqus