`के.के भाऊ चालवतो पीडब्ल्यूडीचा कारभार` , k k agent in nagpur pwd

`के.के भाऊ चालवतो पीडब्ल्यूडीचा कारभार`

`के.के भाऊ चालवतो पीडब्ल्यूडीचा कारभार`
www.24taas.com, नागपूर

नाशिकच्या चिखलीकर लाचखोरी प्रकरणानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या एकाहून एक सुरस कथा बाहेर येऊ लागल्यात. नागपुरात सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटांची फिक्सिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप नागपुरातल्या एका ठेकेदारानं केलाय.

नागपुरात ‘के. के भाऊ’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या एजंटकडून कंत्राटांचे फिक्सिंग केले जात असल्याचा आरोप गिरीश मानापुरे या ठेकेदारानं केलाय. किशोर कन्हेरे असं या एजंटचं नाव असून ते राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त आहेत. किशोर कन्हेरेंचा सार्वजनिक बांधकाम विभागात एवढा दरारा आहे की त्यांच्याच ऑफिसमधून पीडब्लूडीचा कारभार चालत असल्याचं कंत्राटदारांचं म्हणणं आहे. नागपुरच्या इनर रिंग रुटचे सगळ्य़ा रस्त्यांची कंत्राटं कन्हेरे यांनीच फिक्स केल्याचा आरोप मानापुरे यांनी केलाय.

गिरीश मानापुरे या ठेकेदारांनी नागपूर पीडब्लूडीत सगळंच फिक्स असल्याचा आरोप केलाय. मंत्र्यांच्या आशीर्वादानं ही फिक्सिंग सुरु असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

कोण आहे किशोर कन्हेरे?

 छगन भुजबळांचा उजवा हात असल्याचा आरोप

 नागपुरातून ‘पीडब्ल्यूडी’ची कंत्राटे फिक्स करीत असल्याचा आरोप

 सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटांत हस्तक्षेप

 नागपुरातील राष्ट्रवादीचे पॉवरफूल नेते अशी ओळख

 नागपूर सुधार प्रन्यास म्हणजे एनआयटीचे विश्वस्त

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 14, 2013, 14:20


comments powered by Disqus