उष्माघातानं दीड वर्षांच्या ‘गणेशा’चा मृत्यू!, little elephant ganesh died in tadoba

उष्माघातानं दीड वर्षांच्या ‘गणेशा’चा मृत्यू!

उष्माघातानं दीड वर्षांच्या ‘गणेशा’चा मृत्यू!

www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर

उष्माघातानं चंद्रपूरात पहिला बळी घेतलाय. चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गणेश या दीड वर्षाच्या हत्तीच्या पिल्लाचा उश्माघातानं मृत्यू झालाय.

२०१३ मध्ये गणेश जयंती आणि व्हॅलेन्टाईनच्या डेच्या मुहूर्तावर या पिलाचा जन्म झाला होता. म्हणून इथल्या कर्मचाऱ्यांनी लाडानं या छोट्या हत्तीचं ‘गणेश’ असं नाव ठेवलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती. त्याच्यावर स्थानिक पशु वैद्यक अधिकारी उपचार करीत होते. उष्माघाताने ‘गणेश’चा मृत्यू झाल्याचा अंदाज पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी वर्तवलाय.

मात्र, अखेर आज त्याचा मृत्यू झाला. सुशीला या हत्तीपासून गणेशचा जन्म झाला होता. हत्तीणीसोबत लडिवाळ खेळणारं हे पिल्लू वाघांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ताडोबाच्या आनंदाचा एक भाग होतं. ‘गणेशा’च्या जाण्यानं ताडोबा मात्र सुनं पडलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 3, 2014, 16:31


comments powered by Disqus