Last Updated: Sunday, March 3, 2013, 18:05
www.24taas.com, वर्धादेशात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देशात ऐरणीवर आला असताना वर्ध्याच्या गांधी आश्रमातही एका सेविकेवर विनयभंग झाल्याची तक्रार समोर आली आहे. महात्मा गंधींच्या आश्रमातही महिला सुरक्षित नसल्याचं दिसून आलं आहे.
वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमामध्ये काम करणार्या एका सेविकेचा तेथील एका सेवकानेच विनयभंग केला. जालधरनाथ सोनोदे नामक या सेवकाने सेविकेला मारहाण केली. तसंच तिच्या अंगावरील दुपट्टा ओढून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेबद्दल सेविकेने आश्रम प्रतिष्ठानाकडे तक्रारही केली होती. मात्र तरीही कुठलीच कारवाई झाली नव्हती. अखेर पोलीस स्टेशनला तक्रार केल्यावर सोनोदे याला अटक केलं गेलं. वर्धा जिल्हा न्यायालयाने सोनोदे यांना जामीन मंजूर केला आहे.
First Published: Sunday, March 3, 2013, 18:05