पोलिसाची गुंडागिरी, भरचौकात कामगार नेत्याला बेदम मारहाण, police beaten labor in Chandrapur

पोलिसाची गुंडागिरी, भरचौकात कामगार नेत्याला बेदम मारहाण

पोलिसाची गुंडागिरी, भरचौकात कामगार नेत्याला बेदम मारहाण
www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक-एम्टा कोळसा खाणीतील कामगारांच्या सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कामगार नेत्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मारहाणीत प्रमोद मोहोड या कामगार नेत्याचा हात मोडला. दरम्यान, कामात अडथळा आणल्याचा पोलिसांनी दावा केला.

कर्नाटका एम्टा खासगी कोळसा खाणीबाबात धरणे आंदोलन सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक-एम्टा कोळसा खाणीतील कामगारांच्या सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कामगार नेत्याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या या मारहाणीत प्रमोद मोहोड असं नाव असलेल्या कामगार नेत्याचा हात मोडलाय.

गेल्या काही दिवसांपासून या खाणीत स्थानिक आणि परप्रांतीय कामगारांच्या मुद्यावर वाद सुरु आहे. गेल्या पाच दिवसांपासून यासाठी आंदोलन सुरु होते. मात्र गुरुवारी पोलिसांनी या आंदोलकांना अटक करून भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये आणले. प्रत्येक आंदोलनात होते तशी मजुरांनी इथेही नारेबाजी सुरु केली. अटक झाली म्हणून आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते प्रमोद मोहोड पोलिसांसोबत तावातावाणे बोलत होते. मात्र बोलता-बोलता वरोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांचा अचानक पारा चढला आणि त्यांनी मोहोड कशी बेदम मारहाण केली.

पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत. साहेबांनीच दबंगगिरी दाखविली म्हटल्यावर कर्मचा-यांनीही हात धुवून घेतले. हात इतके धुतले कि कामगार नेते मोहोड सामान्य रुग्णालयात हात मोडल्याने दाखल आहेत. प्रमोद मोहोड यांना झालेल्या या मारहाणीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे याची तक्रार केली. मात्र पोलिसांनी प्रमोद मोहोड पोलिसांच्या कामात अडथळा आणत असल्यामुळे बळाचा वापर करण्यात आल्याचे सांगताहेत.

मात्र, चंद्रपूर राष्ट्रीय कोयला संघर्ष संघ अध्यक्ष प्रमोद मोहोड यांना पोलीस उप-अधीक्षक गणेश गावडे यांनी बेदम मारहाण केली. चौकशी करण्याऐवजी जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी याबाबत गावडे यांचे समर्थन केलेय.प्रमोद मोहोड यांना झालेल्या मारहाणीनंतर आंदोलन करणा-या जवळ-जवळ २०० कार्यकर्त्यांनी जामीन घेण्यास नकार आलाय. त्यामुळे त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे.

जिल्ह्यात मंदिरफोड्या, घरफोड्या, अपहरण, आर्थिक गुन्हे हत्या वाढीस लागल्या आहेत चंद्रपूर पोलिसांनी शांततामय मार्गाने आंदोलन करणा-या कामगारांवर हात टाकून मर्दुमकी दाखविण्यापेक्षा गुन्हेगारांना जेरबंद केल्यास जनतेचे भले होईल, अशी आंदोलन कर्त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, December 21, 2013, 20:27


comments powered by Disqus