उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान, Rain in Nashik, Jalgaon, Vidarbh

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक, भंडारा, जळगाव

नाशिक जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा, मुक्ताईनगर, यावल, बोधवड तसंच रावेर तालुक्यात अवकाळी पावसानं रात्री थैमान घातलं. तर विदर्भात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चक्रीवादळासह झालेल्या जोरदार पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, केळी या पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. पारोळा तालुक्यातल्या भोंदण, चोरवड भागात लिंबाच्या आकाराची गारपीट झाल्यानं पिकं भूईसपाट झालीय. नुकसान भरपाईची मागणी शेतक-यांनी शासनाकडे केलीय.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळनंतर वादळी वार्‍यासह पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतक-यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. गहू, द्राक्ष, उन्हाळी कांदा, स्ट्रॉबेरी, डाळींब बागांना पावसाचा जोरदार फटका बसलाय. सटाणा तालुक्यात डाळींब बागा, कांदा पिकात पाणी साचलंय.. तर दिंडोरी, निफाड मधे द्राक्ष मण्यांना तडे गेलेत. तर आदिवासी पटट्यात कापणीला आलेला गहू आडवा झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झालाय.

तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातही ल्या पारोळा, मुक्ताईनगर, यावल, बोधवड तसंच रावेर तालुक्यात अवकाळी पावसानं रात्री थैमान घातलं. चक्रीवादळासह झालेल्या जोरदार पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, केळी या पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून तत्काळ पंचनामे करावे अशी मागणी आता जोर धरू लागलीय.

विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा फटका भंडारा जिल्ह्यातल्या शेतक-यांना बसलाय. पाऊस आणि गारपीटीमुळे धान, मिरची, गहू, या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. तर लाखनी तालुक्यातल्या गावक-यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी पालांदूर आणि दिघोरीत मोठ्या दगडाच्या आकाराच्या गारा पडल्या.

या गारांमुळे घरांवरील कौलं आणि वाहनांच्या काचाही फुटल्या. पालांदूर रस्त्यावर गारांचा सहा इंचांचा थर जमा झाला. मिरची आणि फुलकोबी पूर्ण जमीनदोस्त झालाय. भंडारा पवनी राज्यमार्गावर अनेक ठिकाणी झालं उन्मळून पडली. गारांमुळे नागरिक जखमी होण्याच्या घटनाही घडल्या. वीजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा ठप्प झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणताही कर्मचारी गावात न आल्यामुळे संतापलेल्या गावक-यांनी काही काल रस्ता रोखून धरला होता.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 25, 2014, 12:25


comments powered by Disqus