रेल्वे परीक्षार्थींच्या गाडीला अपघात - Marathi News 24taas.com

रेल्वे परीक्षार्थींच्या गाडीला अपघात

www.24taas.com, वर्धा
 
नागपूर - वर्धा रोडवर रेल्वे भरती परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांच्या कारला झालेल्या अपघातात ८ जण जागीच ठार झाले आहेत. तर दोघ जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
वर्ध्याहून नागपूरला परीक्षा देण्यासाठी निघाले होते. वर्ध्यातल्या पवनारजवळ तवेरा कंटेनरला ध़डकली. या अपघातात ८ जण जागीच ठार झाले आहेत. सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
 
रेल्वे भरती परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा कारला अपघात झाला. त्यात दोन जण जखमी आहेत. दोघांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
 
 
 

First Published: Sunday, May 6, 2012, 13:41


comments powered by Disqus