मुलीसह आईची विहिरीत उडी घेवून आत्महत्या Wardha-lady committed suicide with her 4 month`s girl by jumping in the

मुलीसह आईची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

मुलीसह आईची विहिरीत उडी घेवून आत्महत्या
www.24taas.com , झी मीडिया, वर्धा

वर्धा इथल्या मानस मंदिर परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेनं आपल्या चार महिन्यांच्या चिमुकलीसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. आपल्याच घराच्या मागील विहिरीत या मायलेकींचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मनिषा आशिष पोहाणे ही नुकतीच स्वावलंबी विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरीला लागली होती. ती आपल्या दोन मुली आणि चित्रकलेचे शिक्षक असलेल्या आशिष पोहाणे या आपल्या पतीसह मानस मंदिर परिसरात राहत होती. आज सकाळपासून मनिषा आणि लहान मुलगी हिमजा दिसत नसल्यानं घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र शोध लागला नाही. अखेर घराच्या मागच्या बाजूस असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.

विहीर अगदी घराला लागून आहे असं असतानाही मनिषानं उडी घेतल्याचा आवाज मात्र कुणालाही आला नाही. मागील काही दिवसांपासून मनिषाचं मानसिक स्वास्थ ठीक नसल्याची चर्चा आहे. घरगुती वादातून मानसिक स्वास्थ हरविल्यामुळंच तिनं आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविलाय. काही दिवसांपूर्वी मनिषाच्या भावाचाही मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती तणावात असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, घटनास्थळाजवळ आढळलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर तिचं आहे की नाही, याचा तपास पोलीस करत आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 8, 2013, 15:25


comments powered by Disqus