Last Updated: Tuesday, December 10, 2013, 09:01
www.24taas.com, झी मीडिया, राळेगण सिद्धीज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरलेत. जनलोकपालसाठी अण्णांनी पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय. राळेगणसिद्धीतून आजपासून अण्णा हे बेमुदत आंदोलन सुरु करणार आहेत.
काँग्रेसनं देशाचा विश्वासघात केलाय, अशी टीका करुन जनलोकपालसाठी ‘करो या मरो’ असा निर्धार अण्णांनी यावेळी व्यक्त केलाय.
तर केजरीवालांच्या आम आदमी पार्टीच्या यशाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र पुन्हा निवडणुका झाल्या तर प्रचाराला जाणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं अण्णांनी नमूद केलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 10, 2013, 08:41