Last Updated: Thursday, May 9, 2013, 18:51
www.24taas.com, झी मीडिया, तुळजापूरतुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात तोतया पुजा-यांकडून भाविकांची लूट आणि फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
मंदिराचे महाद्वार आणि प्रदक्षिणा मार्गाजवळ भाविक आल्यानंतर हे तोतया पुजारी त्यांना थेट दर्शनाचं आमिष दाखवून अभिषेक किंवा महापूजेच्या नावानं हजारो रुपये उकळतात. आणि भक्तांना नेहमीच्या दर्शन रांगेत उभा करून पसार होतात. त्यामुळे भाविकांना मोठा आर्थिक फटका आणि मन:स्ताप सहन करावा लागतोय. हे प्रकार सातत्यानं घडत असूनही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा मंदिरातल्या पुजा-यांचा आरोप आहे. त्यामुळे मंदिराच्या पुजा-यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय.
तुळजाभवानी मंदिरातल्या तोतया पुजा-यांच्या वाढत्या उपद्रवामुळे मंदिर प्रशासन आणि ख-या पुजा-यांची नाहक बदनामी होतेय. तोतया पुजा-यांचा तातडीनं बंदोबस्त नाही केला तर उस्मानाबाद जिल्हाधिका-यांच्या ताब्यात असलेल्या मंदिरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, May 9, 2013, 18:50