Last Updated: Tuesday, May 28, 2013, 18:10
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकनाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात पाण्याच्या शोधात फिरणा-या हरणाचा सहावा बळी गेलाय. दुष्काळामुळे जंगलातले पाण्याचे स्त्रोत आटत चाललेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात भटकणारं एक हरीण गणेशपूरमधल्या विहिरीत पडलं.
विहीरीत पडून या हरणाचा मृत्यू झालाय. तालुक्यातील गणेशपूर (सुकी) येथे विहिरीत पडून आज मध्यरात्री हरणाचा बळी गेला. मनमाडजवळच्या जंगलांमध्ये हरिणांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. दुष्काळामुळे जंगलामधलं पाणी संपत चाललंय.
वन्यजीवांना जंगलात पाणीच उपलब्ध होत नाही. त्यामुळेच हरणं पाण्याच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या काळात सहा हरणांचा बळी गेलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 28, 2013, 18:10