बारावीची परीक्षा, लोडशेडिंगची शिक्षा loadsheding at HSC exam

बारावीची परीक्षा, लोडशेडिंगची शिक्षा

बारावीची परीक्षा, लोडशेडिंगची शिक्षा
www.24taas.com, नांदुरबार

बारावीच्या परिक्षांवेळी रात्रीचं लोडशेडींग केलं जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली होती. मात्र काँग्रेसचाच बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या या घोषणेचे तीनतेरा वाजलेत.

आदिवासी विभागाच्या गलथान कारभारामुळे नंदुरबार शहरातील गुरूकुल नगर मधिल वसतीगृहातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अंधारात बारावीचा अभ्यास करावा लागतोय.. प्रशासनाने वेळीच विजबील न भरल्यामुळे परिक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी या वसतीगृहाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांवर मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करण्याची पाळी आली आहे.
दहावी-बारावी आणि पदवीच्या परीक्षा सुरू असेपर्यंत राज्यात सुरू असणाऱ्या संध्याकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच्या लोडशेडींगला राज्य सरकारनं सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान राज्यात कुठेही लोडशेडिंग होणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना लोडशेडिंगशी सामना करतच अभ्यास करावा लागत आहे..

First Published: Thursday, February 21, 2013, 16:30


comments powered by Disqus