Last Updated: Wednesday, February 13, 2013, 10:19
www.24taas.com, मुंबई होय, राज्यातल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं एक गूड न्यूज दिलीय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपेपर्यंत राज्यात लोडशेडिंग केले जाणार नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय. त्यामुळे लोडशेडिंगच्या भागातील विद्यार्थ्यांना बराचसा दिलासा मिळालाय.
दहावी-बारावी आणि पदवीच्या परीक्षा सुरू असेपर्यंत राज्यात सुरू असणाऱ्या संध्याकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच्या लोडशेडींगला राज्य सरकारनं सुट्टी जाहीर केलीय. त्यामुळे परीक्षेदरम्यान राज्यात कुठेही लोडशेडिंग होणार नाही.
पुढच्या आठवड्यात बारावीच्या परीक्षा सुरू होतायत. तसंच पुढच्या काळात दहावी आणि पदवीच्या विविध परीक्षा आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
First Published: Wednesday, February 13, 2013, 10:19