गुप्त धनाचं आमिष दाखवून २ भोंदुबाबांनी फसवलंNashik - fraud of 4 lakh by bhondu baba

गुप्त धनाचं आमिष दाखवून २ भोंदुबाबांनी फसवलं

गुप्त धनाचं आमिष दाखवून २ भोंदुबाबांनी फसवलं
www.zee24taas.com, झी मीडिया, नाशिक

देवळा तालुक्यातल्या हरी ओम बाबाचे काळे कारनामे चर्चेत असताना नाशिकमध्ये आणखी २ भोंदुबाबांचे प्रताप समोर आलेत. गुप्त धनाचं आमिष दाखवून जवळपास साडेचार लाखांना फसवलं गेल्याचं समोर आलंय.

गिरणारे जवळच्या वाडगावच्या कसबे कुटुंबियांच्या घरात गुप्त धन असल्याची बतावणी बांगडीवाला आणि जंगली बाबानं केली होती. त्यासाठी त्यांनी दिवाळीआधी पूजा करुन घेतली. घरातच त्यांनी २ ते अडीच फूट खड्डा खणण्यास सांगितला होता. त्या खड्याला २ दिवस हात लावू नये असं सांगितलं आणि दोन्ही बाबा पसार झाले.

२ दिवसांनंतर कसबे कुटुंबीयांनी त्याची फसवणूक झाल्याचं समोर आलं. साडेचार लाख रुपये एकाच कुटुंबाकडून नाही तर ३ कुटुंबांकडून घेण्यात आले होते. मात्र नंतर त्याची फसवणूक झाल्याचं समोर आलं. ह्या सर्व प्रकाराचा श्रावण कसबे ह्या तरुणाला जबर मानसिक धक्का बसलाय. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरूय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 12, 2013, 16:57


comments powered by Disqus