`दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे`, one month left to dr dabholkar murder, anis andolan in maharashtra

`दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे`

`दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे`

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एक महिना उलटला तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं नाही. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर आंदोलन सुरु केलंय.

पुण्यासह मुंबई नाशिकमध्येही हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यात अंनिसच्या कार्यकर्त्यांनी डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्याच्या ठिकाणी धरणं आंदोलन केलंय. आम्ही सारे दाभोलकरचे फलक घेऊन शेकडो अंनिसचे कार्यकर्ते यावेळी रस्त्यावर उतरले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नाशिकमध्येही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करत आपल्या भावना व्यक्त केल्या. कुणी हाताला तोंडला काळ्या फिती बांधून तर कुणी समाज परिवर्तनाचे गीत सादर करून तर कुणी निषेधाचे फलक झळकावून आपला आक्रोश आपल्या भावना व्यक्त करत होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 21, 2013, 19:01


comments powered by Disqus