अफगाणिस्तान : भारतीय दूतावासावर हल्ला, 4 दहशतवादी ठार

Last Updated: Saturday, May 24, 2014, 00:02

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. इथल्या हेरात शहरात असलेल्या भारतीय दूतावासाबाहेर सकाळी सव्वा तीन वाजता बंदूक आणि ग्रेनेडनं हल्ला केला.

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला

Last Updated: Friday, May 23, 2014, 10:14

अफगाणिस्तानातील हेरात या शहरात भारतीय दूतावासावर काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी आज सकाळी हल्ला केला. गेल्या काही तासांपासून गोळीबार सुरू असून सुरक्षा रक्षकांनी परिसराला घेरले आहे.

मनिष तिवारींनी केली मोदींच्या मुलाखतीची काट-छाट?

Last Updated: Saturday, May 3, 2014, 16:17

नरेंद्र मोदींच्या दूरदर्शनवरील मुलाखतीचं प्रकरण आता चांगलचं चिघळत चाललं आहे. हा वाद समोर आल्यानंतर दूरदर्शनचे ‘सीईओ’ जवाहर सरकार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांच्यावर टीका केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये मोठे भूस्खलन, 350 ठार

Last Updated: Saturday, May 3, 2014, 14:54

अफगाणिस्तानच्या ईशान्य भागात हाहाकार उडाला आहे. जोरदार पाऊस आणि डोंगर खचण्याचा प्रकार मोठ्याप्रमाणात झाल्याने शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्यात अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 350 नागरिक ठार झाले असून, दोन हजारांहून अधिक जण बेपत्ता आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासन, संयुक्त राष्ट्र आणि नाटो सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.

गुडन्यूज... तुमचा पीएफ एटीएममध्ये मिळणार

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 12:29

बॅंक खात्यातील पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसेच आता तुमच्या पीएफ खात्यातील पैसेही एटीएममधून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रशासन कामाला लागले आहे. ही गुडन्यूज केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनीच दिलेय.

जळगाव जिल्ह्यातील बिग फाईट

Last Updated: Monday, April 21, 2014, 17:46

एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यायत.

नव्या नात्यासाठी `इश्कजादीं` तयार!

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 18:01

इश्कजादी परिणीती चोपडा सध्या नव्या नात्यांमध्ये अडकण्यासाठी तयार आहे... तशी कबुली खुद्द परिणीतीनंच दिलीय. याचबरोबर सध्या आपण कुणासोबतही नात्यात नाही, हे सांगायला ती विसरलेली नाही.

तनिषानं अरमान कोहलीला दिलं खास गिफ्ट!

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 12:01

बिग बॉसमधील चर्चित तनिषा मुखर्जीने घरातून नापंसती असतानाही, अरमान कोहलीचा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा केलाचं समजतंय. त्यासाठी तिनं त्याच्यासोबत काही सुट्ट्या एकत्र घालवल्यात.

टी-२० वर्ल्ड कप : बांगलादेश vs हाँगकाँग

Last Updated: Thursday, March 20, 2014, 21:26

नेपाळ vs अफगाणिस्तान

आयसीसी ट्वेन्टी-ट्वेन्टी : अफगाणिस्तान Vs हाँगकाँग

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 20:02

आयसीसी ट्वेन्टी -२० LIVE: अफगाणिस्तान Vs हाँगकाँग afganistan Vs Hongkong

बांग्लादेशमध्ये आजपासून टी-२०चा थरार!

Last Updated: Sunday, March 16, 2014, 09:23

२०-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होतेय. बांग्लादेशमध्ये होतं असलेल्या या वर्ल्डकपमध्ये आजपासून पात्रता फेरीच्या लढती सुरु होतं आहे. सलामीची लढत यजमान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये होतं आहे.

स्कोअरकार्ड :भारतX अफगाणिस्तान (आशिया कप)

Last Updated: Thursday, March 6, 2014, 16:52

स्कोअरकार्ड : भारत X अफगाणिस्तान (आशिया कप)

पराभूत टीम इंडिया आज लाज राखणार का?

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 12:10

सलग दोन पराभव पत्करल्यानंतर आता कोहली अॅण्ड कंपनीचा मुकाबला असणार आहे तो अफगाणिस्तानशी. केवळ प्रतिष्ठा राखण्यासाठी नव्हे तर स्पर्धेतील आव्हान ठिकवण्यासाठी टीम इंडियाला अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवण गरजेच आहे.

आशिया कप : पाकिस्तान X अफगाणिस्तान

Last Updated: Thursday, February 27, 2014, 23:34

आशिया कप स्कोअरकार्ड : पाकिस्तान X अफगाणिस्तान

मेघनानं फुलवली `कमळं`, तनिषाचा `पंजा`चा ड्रेस!

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 23:10

नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी या राजकीय सत्तासंघर्षानं अचानक `सेक्सी` वळण घेतलंय. नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी मेघना पटेल नावाच्या मॉडेलने कपडे काय उतरवले...

राहुल गांधींच्या घरासमोर पुन्हा शीख संघटनांचं आंदोलन

Last Updated: Monday, February 3, 2014, 18:01

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 साली उसळलेल्या शीख विरोधी दंग्याचं भूत काँग्रेसच्या मानगुटीवर पुन्हा बसल्याचं चित्र आहे. 1984 दंगलीविरोधात आज पुन्हा एकदा राहुल गांधींच्या घराबाहेर शीख संघटनांनी निदर्शनं केली.

उद्धव यांची म्हात्रे-राऊळ यांच्याशी भेट, घोसाळकरांवर कारवाई?

Last Updated: Saturday, February 1, 2014, 17:48

शिवसेनेच्या नाराज नगरसेविका शीतल म्हात्रेंची अखेर उद्दव ठाकरेंनी भेट घेतलीय. उद्धव ठाकरेंनी शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि मनीषा चौधरी या तिघा नगरसेविकांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवून घेतलं. त्यांच्याशी संवाद साधला. आणि विनोद घोसाळकरांवर लवकरात लवकर कारवाईचं आश्वासन दिलं.

मारियांनी दिली २५ लाखांची ऑफर- आरोपीचा आरोप

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 20:38

डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनीष नागोरी विकास खंडेलवाल यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

चॅम्पियन जोकोविच `ऑस्ट्रेलियन ओपन`मधून बाहेर

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 20:33

ऑस्ट्रेलियन ओपनचा तीन वेळेस चॅम्पियन असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच पराभूत झालाय. जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडलाय.

धक्कादायक: दिल्ली पुन्हा हादरली, ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर गँगरेप

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:06

देशाची राजधानी पुन्हा हादरलीय. ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर दिल्लीत गँगरेप झाल्याची घटना घडलीय. मंगळवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणांच्या टोळीनं ही घ्रृणास्पद प्रकार केलाय.

गोव्यात अरमान आणि तनिषा एकत्र!

Last Updated: Sunday, January 5, 2014, 16:31

बिग बॉसच्या घरातील लव्हबर्ड्स म्हणून चर्चेत आलेल्या जोड्या गौहर आणि कुशाल यांच्यानंतर आता तनिषा आणि अरमान यांनीही गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतला. मात्र यावेळी अरमान आणि तनिषा हे दोघंही एकटे नव्हते. त्यांच्या बरोबर तनिषची आई, अँडी आणि अँडीची आई देखील होते. त्यामुळं अरमान आणि तनिषाला एकमेकांना एकट्यात वेळ देता आला नाही.

पत्नीशी प्रतारणा... `हार्ट अॅटॅक`कडे वाटचाल!

Last Updated: Monday, December 30, 2013, 16:37

‘रोमान्स’चा ज्वर फारच मोठ्या प्रमाणात चढणाऱ्यांनो सावधान! वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, बायको असताना आपलं हृदय इतर स्त्रियांच्या हवाली करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.

अभिनेत्री तनुजाला पाहून घाबरली होती- गौहर खान

Last Updated: Sunday, December 29, 2013, 22:41

अभिनेत्री गौहर खान जी यावेळी ‘बिग बॉस-७’ची विजेती ठरली. स्पर्धेत जिंकल्यानंतर गौहर म्हणाली, “मला अजिबात वाटत नव्हतं की मी जिंकेल आणि तनिषाच जिंकेल असं वाटलं होतं. अंतिम स्पर्धेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना समोर पाहून तर मला हे नक्की वाटलं की आता आपण जिंकत नाही.”

गौहर खान बिग बॉस-७ची विजेती!

Last Updated: Saturday, December 28, 2013, 23:18

बिग बॉस-७ ची विजेती ठरलीय अभिनेत्री गौहर खान... आज लोणावळा इथं झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये गौहर खानचं विजेती म्हणून नाव घोषित करण्यात आलंय. गौहर खान, तनिषा मुखर्जी आणि संग्राम सिंग हे फायनलमधील स्पर्धक होते. तनिषा आणि संग्रामला मागे टाकत अखेर गौहरनं हे विजेतेपद पटकावलं.

राहुल महाजननं सांगितलं बिग बॉस-७ कोण जिंकणार?

Last Updated: Saturday, December 28, 2013, 18:17

‘बिग बॉस-७’चा ग्रँड फिनाले प्रदर्शित होण्यापूर्वीच बिग बॉसचा आधीचा स्पर्धक असलेल्या राहुल महाजननं हा सिझन कोण जिंकणार याबाबत ट्वीट केलंय.

स्पॅनिश मुलीवर बलात्कार करणाऱ्या अन्सारीला जन्मठेप

Last Updated: Friday, December 27, 2013, 15:26

मुंबईतल्या बांद्राभागात २७ वर्षीय स्पॅनिश मुलीवर बलात्कार करणा-या बादशाह मोहम्मद अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. मुंबई सेशन्स कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. गेल्या वर्षी ७ नोव्हेबरला बादशाह मोहंम्मद अंन्सारीनं स्पॅनिश मुलीवर बलात्कार केला होता. त्याचबरोबर चोरीच्या प्रकरणातही कोर्टानं अंन्सारीला शिक्षा सुनावली आहे.

बिग बॉस ७: गोहर खान एकटी पडली, अन ढसाढसा रडली

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 21:02

बिग बॉस ७ च्या ग्रँड फिनालेला काही दिवस शिल्लक असताना गोहर खान एकटी पडली असून ती गेल्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडली. ती ज्या व्यक्तींनी घरात मित्र समजत होती, त्या व्यक्तींनीच तिला धोका दिला असे तिला वाटत आहे. पण खर पाहिलं तर गोहरने आपला पत्ता योग्य वेळी योग्य रितीने टाकून बाजी मारली आहे.

`बिग बॉस फिनाले` अगोदरच व्हीजे अँन्डी घराबाहेर!

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 15:39

बिग बॉस सिझन-७ मधून ग्रँड फिनालेच्या अगोदरच व्हीजे अँन्डी बाहेर पडलाय. अँन्डीच्या अचानक कार्यक्रमाबाहेर पडल्यानं अनेकांना धक्का बसलाय. कारण, अँन्डी याला विजेतेपदाचा दमदार दावेदार समजलं जात होतं.

अरमान करणार २०१४मध्ये लग्न, पण तनिषाचं काय?

Last Updated: Monday, December 23, 2013, 13:40

रिअॅलिटी शो बिग बॉस- ७च्या घरातून बाहेर काढण्यात आलेल्या अरमान कोहलीनं एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना सांगितलं की, पुढच्या वर्षी मी लग्न करणार आहे. म्हणजेच अरमान कोहली २०१४मध्ये लग्न करण्याचा प्लान करतोय. मात्र अरमान अभिनेत्री काजोलची बहिण तनिषा मुखर्जी बरोबरच लग्न करणार का? हे कोडंच आहे.

केजरीवाल नाही तर मनिष सिसोदिया बनणार मुख्यमंत्री?

Last Updated: Sunday, December 22, 2013, 18:35

‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेचे संकेत दिलेत. पण, भारताच्या राजधानीच्या शहरात मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार? याचा अंतिम निर्णय त्यांनी आपल्या आमदारांवर सोडलाय.

‘जनता की अदालत’मध्ये अरमान करणार सोफियाचा खुलासा

Last Updated: Friday, December 20, 2013, 16:45

‘बिग बॉस ७’ सीजनमध्ये आता स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली असताना त्यात भर टाकण्यासाठी गुरूवारी बिग बॉसच्या घरात ‘जनता की अदालत’ घेण्यासाठी रजत शर्मा यांनी एंट्री केली. त्यामुळे बिग बॉसमध्ये गुरुवारचा दिवस हा स्पर्धकांसाठी वेगळा दिवस राहिला.

बिग बॉस : परतलेल्या अरमानला पाहून तनिषा बेभान!

Last Updated: Thursday, December 19, 2013, 23:40

अभिनेता अरमान कोहलीनं ‘बिग बॉस’मध्ये पुन्हा एन्ट्री घेतलीय. गायिका आणि मॉडेल सोफिया हयात हिनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यानं अरमानला पोलिसांनी अटक केली होती.

बीग बॉस : तुरुंगात अरमानला सलमाननं दिला धीर

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 12:19

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या सोफियानं अरमानची पोलिसांत तक्रार केल्यानंतर अरमानला एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागली. याबद्दल घरातल्या इतर स्पर्धकांना याची कल्पना नव्हती. पण, यावेळी अरमानला मदत करण्यासाठी सर्वात आधी पुढे सरसावला तो ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खान...

`बिग बॉस`च्या घरातून काम्या पंजाबी बाहेर

Last Updated: Sunday, December 15, 2013, 10:19

छोट्या पडद्यावरील चर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन-७ मधून अभिनेत्री काम्या पंजाबी शनिवारी बाहेर पडलीय. काम्यानं बीग बॉसच्या घरात तब्बल १३ आठवडे व्यतीत केलेत.

भाजपच्या `ड्रीम प्रोजेक्ट`ची दौड; `रन फॉर युनिटी`

Last Updated: Sunday, December 15, 2013, 09:50

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त एकतेचा संदेश देणारी ‘रन फॉर युनिटी’ आयोजित करण्यात आली.

‘अरमान-तनिषाचा रोमांन्स... केवळ दिखावा’

Last Updated: Monday, December 9, 2013, 18:59

सोफियाच्या म्हणण्यानुसार, गौहर खान आणि कुशाल टंडन यांच्यामधला रोमांस हा वास्तविक आहे. परंतु, अरमान आणि तनिषाचा रोमांस मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. अरमान आणि तनिषा यांच्यामध्ये सुरू असलेला प्रेमाचा खेळ खोटा आहे ते नाटक करत आहेत.

मी महिलांचा अपमान करीत नाही – रॅप सिंगर हनी सिंग

Last Updated: Friday, December 6, 2013, 21:42

आपल्यावर नेहमी महिलांचा अपमान करतो, असा आरोप होत आहे. मात्र, मी रॅप गाण्यातून महिलांचा अपमान करीत नाही, असे स्पष्टीकरण जगप्रसिद्ध रॅप गायक हनी सिंग याने दिले आहे.

डॉ. दाभोलकर हत्याकांड : कोण आहे हा मन्या नागोरी?

Last Updated: Thursday, December 5, 2013, 16:01

इचलकरंजीतील अट्टल गुन्हेगार मनिष रामविलास नागोरी याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना शस्र पुरविल्याचा दाट संशय पुणे पोलिसांना आहे. मनिष नागोरीवर बेकायदेशीर शस्त्रे विकल्याप्रकरणी आणि खून, खंडणीसारख्या अनेक प्रकरणांत कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत.

‘अरमान’मुळे ‘तनिषा’ला घरच्यांनी वाऱ्यावर सोडलं?

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 14:33

रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बीग बॉस’च्या घरात कुशाल-गौहर आणि अरमान-तनिषा यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे आता काही लपून राहिलेलं नाही.

डॉ. दाभोलकरांच्या मारेक-यांचा तपास पिस्तुलाच्या दिशेने

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 13:10

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेक-यांनी वापरलेलं पिस्तुल इचलकरंजीच्या मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या याच्याकडून विकत घेतलं असल्याचा संशय व्यक्त होतोय.

बीग बॉस : तनिषा मुखर्जीला जोरदार धक्का!

Last Updated: Sunday, December 1, 2013, 15:19

टीव्ही रिअॅलिटी शो ‘बीग बॉस सीझन – ७’ची आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू झालीय. त्याचाच परिणाम म्हणून या कार्यक्रमात एकाच दिवशी अनेक घडामोडी आणि अनेक रंजक किस्से घडताना दिसून येत आहेत.

मेहुणीच्या कृत्यांमुळं ‘सिंघम’ खवळला!

Last Updated: Sunday, December 1, 2013, 13:51

बिग बॉस या रिअॅलिटी शो मध्ये सहभागी असलेल्या तनिषा मुखर्जीच्या कुंटुबातील सर्व सदस्य तनिषावर रागावले आहेत. तनिषाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना वाटते की, तनिषानं लवकरात लवकर बिग बॉसच्या घरातून बाहेर यावं.

बीग बॉस : तनिषा-गौहरनं `बॉयफ्रेंडस्`ला केव्हाच टाकलंय मागे!

Last Updated: Monday, December 2, 2013, 12:08

रिअॅलिटी शो ‘बीग बॉस सीझन – ७’मध्ये सहभागी झालेली एका मोठ्या घरातून आलेली स्पर्धक सगळ्यात जास्त कमाई करणारी स्पर्धक आहे.

बिग बॉस ७: अरमानची गर्लफ्रेंड घरात येणार?

Last Updated: Thursday, November 28, 2013, 13:47

सध्या एक चर्चा होत आहे की अरमान कोहली याची गर्लफ्रेंड तानिया सिंग ही बिग बॉसच्या घरात येऊ शकते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या डेली ड्राम्याचा डोस आता डबल होण्याची शक्यता आहे.

बीग बॉस : तनिषासाठी अजय-काजोलचा सलमानला फोन?

Last Updated: Monday, November 25, 2013, 17:31

‘बीग बॉस सीझन ७’मध्ये सहभागी होण्याच्या निर्णयापासून तनिषा मुखर्जीचे कुटुंबीय नाराज होते. त्यानंतर आता तर घरात तनिषा आणि अरमानच्या वाढत्या जवळकीच्या बातम्यांनी तर तनिषाच्या कुटुंबीयांच्या सहनशीलताच संपलीय.

अरमानच्या आईनं सून ‘तनिषा’साठी पाठवलं गिफ्ट

Last Updated: Saturday, November 23, 2013, 09:55

बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये सर्वात जास्त चर्चेत आणि विवादात असलेली जोडी म्हणजे अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी... बिग बॉसच्या घरात नवनवीन कारनामे रोजच होत असतात. नुकताच कुशाल टंडन या घरात परतलाय. कुशालसोबत घरातल्या मंडळींच्या कुटुंबाकडून काही गिफ्ट पाठवण्यात आले. त्यातलं विशेष असं गिफ्ट म्हणजे अरमानच्या आईनं आपल्या सूनेसाठी म्हणजे तनिषा मुखर्जीसाठी विशेष गिफ्ट पाठवलंय.

बिग बॉस ७- अरमानच्या खोलीसमोर तनिषा Naked ...काय आहे सत्य!

Last Updated: Thursday, November 21, 2013, 16:45

कलर्स वाहिनीवरील जोरदार चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस-७’ मध्ये रोज काहीन काही घडतच असतं. काही दिवसांपूर्वी अशी बातमी पसरली की ‘बिग बॉस-७’मधील स्पर्धक अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी कॅमेऱ्यासमोर पूर्णपणे नग्न आणि आपत्तीजनक अवस्थेत पाहण्यात आले. परंतु आता असे सांगितले जाते की, निर्मात्यांनी या बातमीला साफ नकार दिला आहे. निर्मात्यांनुसार असं काही घडलच नव्हत.

बीग बॉस : कुशालची घरात पुन्हा एन्ट्री?

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 16:01

‘बीग बॉस – सीझन ७’ आता चांगलाच रंगात आलाय. या कार्यक्रमाचा मसाला म्हणजेच रोमान्स... ‘बीग बॉस’च्या घरात सध्या उपस्थित असलेली एक जोडी म्हणजे अरमान-तनिषा... आणि दुसरी जोडी होती गौहर-कुशाल... पण...

बिग बॉस-७: तनिषानं अरमानला केलं प्रपोज!

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 11:28

बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन किस्से घडत असतात आणि सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे ती तनिषा आणि अरमानची जोडी. बिग बॉस-७ या रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांना सुद्धा आता हे कळून चुकलंय की अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी यांच्यात प्रेमप्रकरण सुरू आहे.

बिग बॉस ७ : अरमान आणि एजाझमध्ये जोरदार भांडण

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 15:23

वादविवाद आणि खूपसारा धिंगाणा हा रिअॅलिटी शो चा एक अनिर्वाय भाग झाला आहे. सध्या चर्चेत असणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ७’ पर्व अशाच काही कारणांमुळे गाजतंय, या पर्वातील स्पर्धक अत्यंत वादग्रस्त आहेत. त्यामुळे शोला चांगलाच टिआरपी मिळत आहे. कॅमेऱ्यांसमोर वावरताना जो तो आपली प्रतिभा कशी उत्कृष्ट ठरेल याच प्रयत्नात असतो.

सलमान-कुशालच्या वादात बीग बॉस `सलमानं`च!

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 09:42

घरात हाणामारी करून घराबाहेर पडलेला कुशाल टंगन जेव्हापासून घराबाहेर पडलाय, तेव्हापासून तो सतत चर्चेत आहे. काही वक्तव्यामुळे शोचा होस्ट सलमान खान आणि कुशालमध्ये चांगलाच वादंग निर्माण झालाय.

रागावलेला सलमान म्हणाला, बिग बॉस बघण्यात वेळ घालवू नका!

Last Updated: Monday, November 11, 2013, 16:54

दबंग खान सलमान पुन्हा एकदा भडकलाय आणि तो एवढ्यावरच थांबला नाही तर आवडत नसेल तर तुम्ही बिग बॉस बघण्यात वेळ घालवू नका, असा सज्जड दमही त्यांना प्रेक्षकांना दिलाय.

तनीषाच्या बिग बॉस ७ मध्ये येण्याने कुटुंब नाराज

Last Updated: Sunday, November 10, 2013, 13:50

प्रसिध्द अभिनेत्री तनुजा यांची धाकटी मुलगी तसंच अभिनेत्री काजोलची बहीण आणि अभिनेता अजय देवगणची मेहुणी अशी ओळख असणारी तनीषा ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये येईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तिच्या कुटुंबालाही तिचं या शोमध्ये येणं पसंत नव्हतं. दिवाळीमध्ये या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं.

मुस्लिमच ठरवतात भारताचा पंतप्रधान- अय्यर

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 11:13

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी शारजामध्ये भारताचा पंतप्रधान मुस्लिमच ठरवत असल्याचं विधान केलं.

१३५० किलोचं मंगळयान झेपावलं आणि...शास्त्रज्ञांवर अभिनंदनचा वर्षाव

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 07:27

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक सोनेरी पान आपल्या शिरपेचात खोवलंय. १३५० किलोचं मंगळयान यशस्वीपणे प्रक्षेपित करत हा इतिहास रचलाय. या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे.

बिग बॉस-७: सलमान भेदभाव करतो, कुशलचा आरोप

Last Updated: Thursday, October 31, 2013, 16:35

टीव्ही अभिनेता कुशल टंडननं ‘बिग बॉस-७’चा होस्ट सलमान खान हा तनिषा मुखर्जीच्या बाबतीत भेदभाव करतो, असं म्हटलंय. कुशल मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरातून आऊट झाला.

सलमानला आला राग, म्हणाला बिग बॉसचा हा शेवटचा सिझन!

Last Updated: Monday, October 28, 2013, 08:45

बिग बॉस-७च्या सेटवर सलमान खानला राग आला आणि त्यानं हा सिझन आपला अखेरचा सिझन असल्याचं जाहीर केलं. टीव्हीवरील ‘बिग बॉस-७’ या रिअॅलिटी शोचा सलमान खान होस्ट आहे. या शोमध्ये बिग बॉसच्या घरात असलेल्या अभिनेता कुशाल टंडन यानं तनिषा मुखर्जी सोबत केलेल्या दुर्व्यवहाराला कंटाळून ही चेतावनी दिलीय.

फिल्म रिव्ह्यू : मसालेदार `मिकी वायरस`

Last Updated: Saturday, October 26, 2013, 20:43

युवा पिढीच्या याचं टॉपिकवर आधरीत सौरभ वर्माचा ‘मिकी वायरस’ हा हलका-फुलका कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

अँन्डी `छक्का`, काम्या `डिव्होर्सी`... अरमान घसरला!

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 16:00

रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये आता ‘बिग फाईट’ पाहायला मिळतेय. यंदाच्या सीझनमधल्या स्पर्धकांमध्ये अरमान कोहली भांडखोर आणि अधिक रागीट स्वभावासाठी चांगलाच चर्चेत आलाय.

अफगाणिस्तानात पुन्हा शिरण्याचा तालिबानचा डाव!

Last Updated: Saturday, October 5, 2013, 18:17

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अतिरेक्यांविरूध्द लष्करी कारवाई करणाऱ्या नाटो फौजा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. नाटोच्या फौजा बाहेर पडल्यावर अफगाणिस्तानच्या सेनेवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. तर या सैन्याचा पाडाव करुन अफगाणिस्तान पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी तालिबान सज्ज होत आहे. तालिबानच्या या तयारी संदर्भातले वृत्त ‘द इंडिपेंडन्ट’ या ब्रिटीश वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलंय.

दूध संघांना हवी राज्य सरकारची मदत

Last Updated: Sunday, September 22, 2013, 19:45

सहकारी दूध संघ सध्या तोटा सहन करुन दुधाची विक्री करत आहेत. दूध विक्री दरात वाढ करुन जनतेचा रोष पत्करण्याऐवजी राज्य सरकारने सहकारी दूध संघांना मदत देण्याची मागणी करण्यात येतंय.

`दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे`

Last Updated: Saturday, September 21, 2013, 19:01

एक महिना उलटला तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं नाही. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर आंदोलन सुरु केलंय.

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्यावर अण्णा हजारे नाराज

Last Updated: Saturday, September 21, 2013, 11:42

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे नाराज झालेत. रविवारी हरियाणातल्या रेवारीमध्ये झालेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात सिंह नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर बसल्यानं अण्णा नाराज झालेत. त्यामुळं त्यांच्याशी संबंध तोडल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तानात भारतीय लेखिकेची गोळ्या घालून हत्या

Last Updated: Friday, September 6, 2013, 08:43

भारतीय लेखिका सुश्मिनता बॅनर्जी यांची काबुलमध्येच तालिबान्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांनी अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता असताना आलेल्या अनुभवांवर आधारीत दोन पुस्तके लिहिली आहेत.

काँग्रेसविरोधात `शिरोमणी`, मनीष तिवारींविरोधात `सनी`!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 16:11

पंजाबच्या शिरोमणी अकाल दलाने काँग्रेसविरोधात बॉलिवूड स्टारला उभं करण्याचं ठरवलं असून यामुळे काँग्रेसच्या मनीष तिवारींना मोठं आव्हान असेल.

पुण्यात ३ पिस्तुले, १५ काडतुसे जप्त

Last Updated: Saturday, August 17, 2013, 12:06

पुण्यामध्ये स्वारगेट पोलिसांनी ३ पिस्तुलं आणि १५ काडतुसं जप्त करण्यात आलेत. संतोष बो़डके या व्यक्तीकडून ही पिस्तुलं पकडण्यात आलीयेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मनिषा बोडके यांचा संतोष हा पती आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय.

पूजा भट्टसाठी `तो` २१ वर्षांपासून जेलमध्ये!

Last Updated: Friday, August 9, 2013, 19:27

चित्रपटसृष्टीतील अनेक हिरो हिरोईनच्या प्रेमात पडल्याचे आपण नेहमी ऐकत असतो. त्यांना भेटण्यासाठी काहीही करण्यांची तयारी असते. तसेच अभिनेत्री पूजा भट्ट हीच्या प्रेमात पागल झालेला एक प्रेमी,तिचा चाहता गेल्या २१ वर्षापासून भारतांच्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे.

भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Last Updated: Friday, July 26, 2013, 11:17

भारताने तयार केलेला इन्सॅट-३ डी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेय. या उपग्रहामुळे हवामानाचा अंदाज आणि नैसर्गिक संकटाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

`बाल्ड अॅन्ड ब्युटीफूल`... मनिषा कोईराला!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 10:49

कॅन्सरवर मात करून भारतात परतलेल्या मनिषाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ झळकतोय. केमोथेरपीमुळे तिचे केस गळाले असले तरी आजही ती तितकीच सुंदर दिसतेय.

मोदींची मार्केट व्हॅल्यू ५ रूपये - काँग्रेस

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 12:45

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्केट व्हॅल्यू ५ रूपये आहे. ही मोदींची खरी किंमत आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रवक्ते आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे.

काबूलमध्ये राष्ट्रपतींच्या घरावर तालिबानी हल्ला...

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 10:10

काबूलमध्ये स्फोट आणि गोळीबारासारख्या घटनांना पुन्हा एकदा सुरुवात झालीय. पोलिसांनी हा हल्ला दहशतवाद्यांकडूनच झाल्याचं कबूल केलं असलं तरी या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

`उगाचच चर्चा नको, फक्त सदिच्छा भेट`

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 14:01

भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची दखल घेतली. गेल्या काही दिवसांत विशालयुती आणि टाळीची चर्चा रंगत असल्यामुळे ही भेटही लाईमलाईटमध्ये आली होती.

राज ठाकरेंच्या भेटीला देवेंद्र फडवणीस, चर्चेला उधाण

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 12:33

भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत.

हा तर माझा पुनर्जन्म - मनिषा कोईराला

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 16:17

अभिनेत्री मनिषा कोईराला अखेर कर्करोगावर मात करण्यात यशस्वी झालीय. ही बातमी जेव्हा खुद्द मनिषाला समजली तेव्हा मात्र तिच्या भावनांचा बांध फुटला आणि तिनं मनसोक्त रडून घेतलं. ‘माझा हा पुनर्जन्म असल्याचं मनिषानं म्हटलंय’.

‘मार्केट-२’मधून मनिषाचं पुनरागमन?

Last Updated: Saturday, March 30, 2013, 11:03

न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेली मनिषा कोईराला लवकरच दिग्दर्शक जय प्रकाश यांच्या ‘मार्केट २’मध्ये दिसण्याची शक्यता आहे. खुद्द जय प्रकाश यांनीच याबद्दल माहिती दिलीय.

हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?

Last Updated: Thursday, February 21, 2013, 21:44

हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यावर संशयाची सुई दहशतवादी संघटनांच्या दिशेने फिरू लागली आहे. इंडियन मुजाहिद्दीन, हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी, लष्कर-ए-तोयबा या संघटनांवर आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

विश्वरुपमच्या वादानंतर... ‘सिनेमेटोग्राफी’ कायद्यात बदल?

Last Updated: Thursday, January 31, 2013, 12:57

‘विश्वरुपम’या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकार कायद्यांत बदल करण्याचा विचार करतंय. याविषयीचे संकेत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी कायद्यात बदल करण्याचे संकेत दिलेत.

`चर्चेसाठी पाकनं आधी चूक कबूल करावी`

Last Updated: Thursday, January 17, 2013, 15:00

‘पाकिस्ताननं पहिल्यांदा आपली चूक कबूल करावी आणि भारतीय सैनिकांची क्रूर पद्धतीनं हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी’, असं केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी म्हटलंय.

`केमोथेरेपी`साठी मनिषा घाबरलेल्या अवस्थेत...

Last Updated: Thursday, January 3, 2013, 10:12

अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या कँसरशी झुंजतेय. नुकतीच तीच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीय. पण, यानंतर केल्या जाणाऱ्या केमोथेरेपीच्या ट्रीटमेंटसाठी मनिषा मात्र घाबरलेल्या अवस्थेत आहे.

‘बलात्कारासाठी ममता किती चार्ज करणार?’

Last Updated: Friday, December 28, 2012, 16:09

सीपीएमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनीसूर रेहमान यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘रेपसाठी त्या स्वत: किती चार्ज करणार’ असा प्रश्न विचारलाय.

मोबाईल `टीचर`च्या भूमिकेत, देणार शिक्षणाचे धडे

Last Updated: Thursday, December 13, 2012, 15:25

काही मुस्लीम देशांमध्ये मुलींना शिक्षण घेण्यास बंदी करण्यात आली आहे. तर तालिबानने महिलांनी शिक्षण घेवू नये म्हणून फतवा काढला आहे. मात्र, अफगाणिस्तानने नामी युक्ती शोधून काढली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्यासाठी मोबाईलचा वापर केला आहे. आता मोबाईल टीचर असणार आहेत.

मनीषा कोइरालाची कॅन्सरवर मात

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 17:33

कॅन्सरशी झगडत असणाऱ्या अभिनेत्री मनीषा कोइरालाची न्यू यॉर्कमध्ये यशस्वी सर्जरी झाली असून आता ती कॅन्सरमधून बचावली आहे.

सर्वांचा पगार होणार कमी, कटींग जास्त

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 13:19

आगामी काळात नोकरदारांच्या हातात कमी पगार येण्याची शक्यता आहे. भविष्य निर्वाह निधी, म्हणजे पीएफचं कटिंग वाढण्य़ाचे संकेत पीएफ कार्यालयाच्या एका सूचनेमुळे मिळतायत.

न्यूयॉर्कमध्ये आज मनिषावर शस्त्रक्रिया...

Last Updated: Thursday, December 6, 2012, 15:08

बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पीटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गुरुवारी तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ही माहिती मनीषाच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिलीय.

मनिषा कोईराला उपचारांसाठी अमेरिकेत जाणार

Last Updated: Saturday, December 1, 2012, 21:48

बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याचे समजते आहे. पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय मनिषाने घेतला आहे.

मनिषा कोईराला रूग्णालयातून सोडलं

Last Updated: Friday, November 30, 2012, 21:18

अभिनेत्री मनिषा कोईराला हिला आज सकाळी जसलोक रूग्णालयातून सोडण्यात आलं. सुत्रांच्या माहितीनुसार मनिषाला चक्कर आल्यानंतर तिला बुधवारी मुंबईतील जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मनिषा कोईराला कँसरशी झगडतेय...

Last Updated: Thursday, November 29, 2012, 16:29

‘इलू इलू’ गर्ल मनिषा कोईराला हिला कँसर असल्याचं निदान झालंय. ती सध्या मुंबईतील जसलोक हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे.

भारतीय वाईनला जगाचं `चीअर्स`

Last Updated: Sunday, September 30, 2012, 12:30

भारतीय वाईनला आता आंतरराष्ट्रीय व्हाईन आणि वाईन ऑर्गनायझेशनचा सदस्य होण्याचा मान मिळालाय. या सदस्यत्वामुळे तिला जागतिक मानांकन मिळणार आहे. या संस्थेच्या सदस्य असलेल्या पंचेचाळीस देशांमध्ये भारतीय वाईनला बाजारपेठ खुली होणार आहे.

अफगाणिस्तान बाहेर, टीम इंडियाचा मार्ग मोकळा

Last Updated: Saturday, September 22, 2012, 12:34

इंग्लंडने अफगाणिस्तानचा ११६ धावांनी दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे अफगाणिस्तानचं टी-२०विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

भारताच्या विजयाचा `श्रीगणेशा`

Last Updated: Friday, September 21, 2012, 19:57

टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध विजयासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागला. भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध 23 रन्सने विजय मिळवला असला तरी बॅट्समन आणि बॉलर्सची कामगिरी निराशाजनकच होती. टी-20 वर्ल्ड कपचा पहिल्याच लढतीत लिंबुटिबू अफगाणीस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं...

टी २० वर्ल्डकप : अफगाणसमोर १६० रन्सचं टार्गेट

Last Updated: Wednesday, September 19, 2012, 21:53

टी-२० वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान एकमेकांना लढत देत आहेत. कोलंबोतल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर ही मॅच रंगतेय.

PSLV C-२१चे यशस्वी उड्डाण

Last Updated: Sunday, September 9, 2012, 13:49

इस्रोचं अंतराळात १००वं स्पेस मिशन असलेलं भारताच्या मिशन मंगळला सुरुवात झालीय. मंगळावर पाण्याचा शोध घेण्यासाठी PSLV C-२१ आज सकाळी ९ वाजून ५१ मिनीटांनी अवकाशात झेपावलंय.

मुंबईत हिंसक जमावाकडून जाळपोळ,तोडफोड

Last Updated: Sunday, August 12, 2012, 06:43

आसाम येथील हिंसाचारामध्ये अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे बर्मा येथील मुस्लिमांनी केलेल्या निषेधाला हिंसेचं स्वरुप आलं आहे. यामुळे सीएसटी भागात अशांतता पसरली आहे. निषेध करणाऱ्या पथकाने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या ओबी गाडीलाही आग लावली.

काबूल बॉम्ब स्फोटात ८ ठार

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 00:47

तालिबानमधील दहशतवाद अजूनही धुमसतोय. काबूळमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात आठ जण ठार झालेत. हा हल्ला अफगाणीस्तान सरकारला धक्के देण्यासाठी करण्यात आल्याचे म्हटले आहे.

‘मातोश्रीवर येऊन जिगर घेऊन जा...’

Last Updated: Tuesday, August 7, 2012, 11:28

‘मित्रा, हिंमत हरू नकोस! असं म्हणत अडवाणींना धीर देतानाच ‘‘मातोश्री’वर येऊन आमच्याकडून हिंमत व जिगर कामापुरती घेऊन जा’ असा उपरोधिक टोलाही बाळासाहेबांनी लालकृष्ण अडवाणींना लगावलाय.

'पुढचा पंतप्रधान काँग्रेस-भाजपचा नाही' - अडवाणी

Last Updated: Sunday, August 5, 2012, 19:17

लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेस आणि भाजपला बहुमत मिळणं अशक्य असल्याचं भाकित वर्तवलंय खुद्द भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी... राजकारणात अनेक वर्ष घालवलेल्या अनुभवी अडवाणींनी आपले विचार मांडण्यासाठी ब्लॉगचा आधार घेतलाय. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपचा पंतप्रधान होणार नाही, असंही अडवाणींनी या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

तालिबानमध्ये मुलींना विष देऊन मारले

Last Updated: Monday, July 9, 2012, 23:08

तालिबाननं आत्तापर्यंत एक हजार शाळकरी मुलींना विष देऊन मारल्याचं सांगण्यात येतंय. तर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवून एका महिलेला क्रूरपणे मारलंय. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हिंसाचार पुन्हा एकदा जगासमोर आलाय.

सेनेला दे धक्का, कपिल पाटीलांचा विजय झाला पक्का

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 17:27

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाचा निकाल आताच आपल्या हाती आला आहे. कपिल पाटील यांचा मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विजय झाला आहे. शिवसेना पुरस्कृत उमेदवार मनिषा कायंदेचा त्यांनी पराभव केला आहे.

रेव्ह पार्टीत मनिषा कोईरालाही सहभागी

Last Updated: Monday, May 21, 2012, 09:50

मुंबईतल्या रेव्ह पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाही आढळल्याचं पुढं आलंय. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी मनिषादेखील पार्टीत उपस्थित होती. पोलिसांनी मनिषाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. तसंच रेव्ह पार्टीचा आयोजक विषय हांडा याला पोलिसांनी अटक केलीय. हांडा हा ओक वूड हॉटेलचा डायरेक्टर आहे.

काबूलमध्ये बॉम्बस्फोट, ६ ठार

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 15:02

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आज बुधवारी अफगणिस्तानच्या दौऱ्यावर रवाना होताच, सकाळी राजधानी काबूलमध्ये तीन बॉम्बस्फोट मालिका घडवून सलामी दिली. या बॉम्बस्फोटांमध्ये सहा जण ठार झाले आहेत. तर १७ जण गंभीर जखमी आहेत.