भारत कृषक समाजाचं कृषी प्रदर्शन माहितीपूर्ण - Marathi News 24taas.com

भारत कृषक समाजाचं कृषी प्रदर्शन माहितीपूर्ण

विकास भदाणे,www.24taas.com,जळगाव
 
कृषी विस्तार, विकास तसचं पूरक व्यवसायाबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी म्हणून भारत कृषक समाजाने जळगावात नुकतचं कृषी प्रदर्शन पर पडलं. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या १५० स्टॉल्सच्या माध्यामातून हजारो शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेता आला.
 
भारत कृषक समाजाचं ६वं कृषी प्रदर्शन १३ ते १६ जानेवारी दरम्यान जळगावात भरविण्यात आलं होतं. या प्रदर्शनात कृषी योजना विस्तार तसंच कृषीविषयक विकासासंदर्भात सुमारे १५० स्टॉल्सची उभारणी करण्यात आली होती. शेतकऱ्यांना एकाच छताखाली कृषीविषयक माहितीचा खजिना भारत कृषक समाजानं खुला करुन दिला होता.
 
कृषी भारताचं प्रदर्शन आयोजन करण्यापूर्वी ८०० गावांमध्ये या प्रदर्शनाचा प्रसार आणि प्रचार करण्यात आला होता. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने प्रदर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान कृषी भारतीसारख्या प्रदर्शनातून उत्पन्नांची माहिती भिन्न असली तरी शेतकऱ्यांना शेतमालाचं मार्केटींग कसं करावं, याबाबतही मार्गदर्शन होणे गरजेचं आहे.

First Published: Tuesday, January 17, 2012, 09:01


comments powered by Disqus