Last Updated: Tuesday, January 17, 2012, 14:16
www.24taas.com, नाशिक नाशिकमध्ये देवळाली कॅम्प परिसरात २१ सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात एक जण जखमी झाला. दहा ते बारा सिलिंडरमधून गळती झाल्याची माहितीही समोर येत आहे. देवळालीतल्या लिंगायत कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे.
वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरताना हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्फोटानंतर आग लागल्यानं अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. सिलिंडरचा स्फोट झाल्यानं देवळाली परिसरात खळबळ उडाली आहे. हा स्फोट झाल्यानंतर लगेचच १० ते १२ सिलेंडरचा स्फोट होऊन ती हवेत उडत असल्याचं प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलं. त्यानंतर लगेचच आजुबाजूच्या परिसरातील शाळा आणि घरं रिकामी करण्यात आली.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरीत्या वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती स्थानिकांनी सांगितलं. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली, तरी नुकसान किती झालं आहे याबाबत माहिती मिळाली नाही.
First Published: Tuesday, January 17, 2012, 14:16