नाना पाटेकर,रिमा यांना घडविणाऱ्यांची मुंबईत कार्यशाळा, Vijaya Mehta`s workshops in mumbai

विक्रम गोखले, नाना पाटेकर,रिमा यांना घडविणाऱ्यांची मुंबईत कार्यशाळा

विक्रम गोखले, नाना पाटेकर,रिमा यांना घडविणाऱ्यांची मुंबईत कार्यशाळा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अनेक दिग्गज कलाकारांना ज्यांनी घडवलं. मराठी रंगभूमीवरचवर ज्यांचं एक वेगळंच स्थान आहे, अशा विजया मेहता खास आपल्या विद्यार्थांसाठी पुन्हा एकदा कार्यशाळा आयोजित करणार आहे.

विक्रम गोखले, नाना पाटेकर, रिमा, भारती आचरेकर, नीना कुलकर्णी सारख्या अनेक दिग्गज मंडळींना यांनी घडवलं. रंगभूमीवरचा चालता बोलता अभ्यासक्रम म्हणजेच विजया मेहता. विजयाबाइंच्या सगळ्याच विद्यार्थांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

येत्या ११ ते १५ फेब्रुवारीला स्वत: विजयाबाई पाच दिवसांची कार्यशाळा घेणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यशाळेसाठी नोंदणी सुरु झाल्याबरोवरच, त्यात नावं नोंदवली ती चक्क विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, सुहास जोशी सारख्या नाट्य आणि सिनेजगतातल्या दिग्गजांनी. मुंबईतल्या रवींद्रनाट्य मंदिरात ही कार्यशाळा भरणार असून, अनेकसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, January 11, 2014, 20:46


comments powered by Disqus