१० महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात - Marathi News 24taas.com

१० महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर या राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
 
मुंबईत २२७ प्रभाग, नागपूर-१४५, पुणे-१४४ ठाण्यात-१३०, पिंपरी-चिंचवड-१२६, नाशिक-१३०, सोलापूर-१०२, अमरावती- ८७, उल्हासनगर-७८, अकोला- ७३ प्रभागांचे लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान होत आहे. राज्यातील २ कोटी २ लाख ९९ हजार ५३६ मतदारांच्या हाती महापालिकांचा कारभार कोणाच्या हाती सूपूर्द करायचा याचं भवितव्य निश्चित करतील.
 
मुंबई, ठाणे, नाशिक, उल्हासनगर, नागपूर महापालिकांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघडी झाली आहे. तर पुणे, पिंपरी-चिंचवड, अकोला आणि अमरवातील महापालिकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढत आहेत.  शिवसेना, भाजप आणि रामदास आठवलेंची रिपाइंची युती राज्यातील नाशिकचा अपवाद वगळता नऊ महापालिकांमध्ये मतदारांचा कौल मागत आहे.
 
 

First Published: Thursday, February 16, 2012, 08:50


comments powered by Disqus