रॉजर फेडररला झाली दुसऱ्यांदा जुळी मुलं!Federer celebrates birth of second set of twins

रॉजर फेडररला झाली दुसऱ्यांदा जुळी मुलं!

रॉजर फेडररला झाली दुसऱ्यांदा जुळी मुलं!
www.24taas.com, वृत्तसंस्था, झुरीच

टेनिसपटू रॉजर फेडरर दुसऱ्यांदा जुळ्या मुलांचा पिता झालाय. त्याची पत्नी मिर्का हिनं दुसऱ्यांदा जुळ्यांना जन्म दिला. दोन्ही मुलं असून त्यांची नावं लिओ आणि लेनी अशी आहेत. चार वर्षांपूर्वी मिर्काला मायला रोझा आणि चार्लीन रिव्हा या जुळ्या मुली झाल्या. फेडररनं ‘ट्‌वीटर`द्वारं ही ‘गुड न्यूज` दिली.

‘लिओ-लेनी यांचा मंगळवारी संध्याकाळी जन्म झाला ही आनंदाची बातमी सांगताना मिर्का आणि मला अत्यंत आनंद होतो,`असं ट्‌वीट फेडरलनं केलंय. पत्नीसोबत असावं म्हणून फेडररनं माद्रिद मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतली आहे. पुढील आठवड्यात रोममध्ये होणाऱ्या स्पर्धेतही तो खेळण्याची शक्यनता कमी आहे. फ्रेंच ओपनमध्ये मात्र तो खेळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, आजी-माजी टेनिसपटूंनी फेडररचं अभिनंदन केलंय. माजी विंबल्डन विजेते बोरीस बेकर यांनी म्हटलं आहे की, "मिर्का आणि रॉजरचं अभिनंदन. त्यांच्या कुटुंबात नव्यानं भर पडली आहे. लिओ आणि लेनी यांची मिश्र दुहेरीत त्यांच्या मोठ्या बहिणींसह छान जोडी जमेल.` महेश भूपती, ख्रिस एव्हर्ट, डॅरेन कॅहील यांनीही ‘ट्‌वीटर`च्या माध्यमातून अभिनंदन केलंय. फेडररची मोठी बहीण डायना हिलाही जुळी मुलं आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 10:31


comments powered by Disqus