Last Updated: Tuesday, August 20, 2013, 16:14
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईइंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सायना नेहवालचा विजयी धडाका कायम आहे. हैदराबाद हॉटशॉट्स विरुद्ध पुणे पिस्टन्समध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सायनानं ज्युलियन शेंकवर मात करत रंगतदारपणे विजय मिळवला.
सायना नेहवाल आणि ज्युलियन शेंकवर यांच्यातील वुमेन्स सिंगल्सची मॅच अतिशय चुरशीची झाली. त्यांच्यातील रंगतदार मॅच म्हणजे मुंबईकरांसाठी पर्वणीच ठरली. रंगतदार झालेल्या लढतीमध्ये सायनानं शेंकवर 17-21, 21-19, 11-6नं मात केली.
पहिला गेम गमावल्यानंतर सायनानं दुसऱ्या गेममध्ये जोरादार कमबॅक केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाचा खेळ चांगलाच बहरला आणि तिनं 11-6नं तिसरा गेम जिंकत मॅचही जिंकली. सायनाच्या या शानदार खेळानं मुंबईकरांनी एक जबरदस्त मॅचचा आनंद लुटला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, August 20, 2013, 16:14