Last Updated: Thursday, June 13, 2013, 09:29
www.24taas.com, झी मीडिया, कोरियात झालेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणार्याक राही सरनोबतचा राज्य सरकारतर्फे एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
सह्याद्री शासकीय विश्रामगृहात बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते एक कोटींचा चेक सुपूर्द करण्यात आला. कोरियातील चँगवॉनमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये राहीनं २५ मीटर स्पोर्टस् पिस्तूल प्रकारात कोरियाच्या क्योंगे किम हिला ८-६ असे नमवून गोल्ड मेडल पटकावलं होतं. पिस्तुल प्रकारात अशी कामगिरी ती भारताची पहिली महिला नेमबाज ठरली होती. राहीच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिला क्लास वनची नोकरी देण्याचे आश्वासनही सरकारतर्फे देण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 13, 2013, 09:26