पी. व्ही. सिंधू आणि सायना येणार आमने-सामने, P.V. Sindhu and Saina Nehwal will Face to face in IBL

सिंधू आणि सायना येणार आमने-सामने

सिंधू आणि सायना येणार आमने-सामने
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

आयपीएलच्या धर्तीवर लवकरच सुरू होणाऱ्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्राँझपदक मिळविणारी भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल आमने-सामने येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये अवध वॉरियर्सकडून खेळणाऱ्या सिंधूची ऑलिंपिक पदक विजेत्या सायना नेहवालविरुद्ध १५ ऑगस्टला लढत आहे. अवध वॉरियर्स आणि हैदराबाद हॉटशॉट्स यांच्यात दिल्लीतील डीडीए बॅडमिंटन आणि स्क्वॉश स्टेडियममध्ये हा मुकाबला रंगणार आहे.

आयबीएलमधील खडतर आव्हानांसाठी मी सज्ज झालीय. जागतिक स्पर्धेत अनेक मातब्बर खेळाडूंवर मात केल्यानं माझा आत्मविश्वास उंचावला आहे. आयबीएलमध्ये एकापेक्षा दिग्गज खेळाडूंचा सामना करत येणारी प्रत्येक आव्हानं पेलण्यासाठी मी तयार असल्याचं, सिंधूनं म्हटलंय. शिवाय सायनाविरुद्ध खेळताना मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. मला आशा आहे, की माझा खेळ चांगला होईल, असंही सिंधू म्हणालीय.

तेव्हा आता सगळ्यांच्या नजरा असतील त्या सिंधू आणि सायनाच्या मुकाबल्याकडे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, August 12, 2013, 16:36


comments powered by Disqus