इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सायना नेहवालवर सर्वाधिक बोली! Saina Nehwal in IBL

आयबीएल सायना नेहवालवर सर्वाधिक बोली!

आयबीएल सायना नेहवालवर सर्वाधिक बोली!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

इंडियन बॅडमिंटन लीगसाठी आज खेळाडूंचा लीलाव झाला. हैदराबाद हॉट्सशॉट्स टीमने लंडन ऑलिम्पिक विजेती सायना नेहवालला १,२०, ००० डॉलर्समध्ये खरेदी केलं. पुरुषांच्या जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मलेशियाच्या ली चोंग वेईला सर्वाधिक बोली लागली. मुंबई मास्टर्स संघाने त्याला १,३५,००० रुपयांमध्ये खरेदी केलं.

येत्या १४ ते ३१ ऑगस्ट या काळात देशाच्या सहा शहरांमध्ये आयबीएलचं आयोजन होणार आहे. दहा लाख डॉलर्सच इनाम असलेल्या या स्पर्धेत जगभरातील ५० खेळाडू सहभागी होणार आहेत.

भारताचा बॅडमिंटन स्टार पी. कश्यपला बांगा बीट्सने ७५, ००० डॉलर्सने खरेदी करुन आपल्या संघात घेतलं. तसंच पी व्ही सिंधुला लखनौ वॉरियर्सने ८० हजार डॉलर रुपयांमध्ये खरेदी केलं. याशिवाय ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाला अपेक्षेपेक्षा कमी बोली लागली. ज्वालासाठी दिल्ली स्मॅशर्सने ३१ हजार डॉलरची बोली लावली तर पोनप्पाला पुणे पिस्टंसने २५ हजार डॉलरमध्ये खरेदी केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 22, 2013, 23:36


comments powered by Disqus