सायना पुढे, पेस आता घरी परतणार... - Marathi News 24taas.com

सायना पुढे, पेस आता घरी परतणार...

www.24taas.com, लंडन
 
सायना नेहवालची विजयी घौडदोड सुरूच
 
सायना नेहवालने प्री क्वार्टर राऊंडमध्ये नेदरलँडच्या याओ जीचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय... सायनाने 21-14, 21-16 ने आरामात ही मॅच जिंकली... याआधी सायना नेहवालने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनची क्वार्टर फायनल गाठली होती...
 
मात्र तिला क्वार्टर फायनलमध्ये गाशा गुंडाळावा लागला होता...त्यामुळे यावेळी सायना क्वार्टर फायनलची मॅच जिंकून ऑलिम्पिक मेडल पक्क करण्याच्या इराद्यानेच बॅडमिंटन कोर्टवर उतरणार आहे...
 
 
लिएँडर पेस ऑलिम्पिक बाहेर
 
ऑलिम्पिक टेनिसमध्ये भारताचं मेन्स डबल्समधील आव्हान सपुष्टात आलं आहे. महेश भूपती आणि रोहन बोपन्नाला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर लिएँडर पेस आणि विष्णु वर्धन जोडीचं ऑलिम्पिकमधून पॅकअप झालं आहे.
 
पेस-वर्धनला फ्रान्सच्या जो-विल्फ्रेड त्सोंगा आणि मायकल लोड्रा जोडीनं 7-6, 4-6, 6-3 नं पराभूत केलं. पहिला सेट गमावल्यानंतर पेस-वर्धन जोडीनं जोरदार कमबॅक केला. मात्र तिस-या आणि निर्णायक सेटमध्ये त्यांनी गमावला. आणि त्यांना ऑलिम्पिकमध्ये सेकंड राऊंडमधूनच एक्झिट घ्यावी लागली.
 
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Thursday, August 2, 2012, 13:36


comments powered by Disqus