Last Updated: Wednesday, September 4, 2013, 12:02
www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क भारताचा टेनिसपटू लिअँडर पेसन यानं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीत चेक प्रजासत्ताकचा टेनिसपटू राडेक स्टेपनाक याच्या साथीने उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.
पेस आणि स्टेपनाक या जोडीनं पाकिस्तानचा एहसान अल-कुरेशी आणि नेदरलँडच्या जीन ज्युलियन रॉजर या जोडीचा ६-१, ६-७, ६-४ असा पराभव केला. सहावे मानांकन असलेल्या पेस-स्टेपनाक जोडीने पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पण, तिसऱ्या सेटमध्ये पेस आणि स्टेपनाक जोरदार पुनरागमन करत कुरेशी-रॉजर जोडीची सर्व्हिस ब्रेक करत पॉईंट मिळविला आणि आपली सर्व्हिस कायम ठेवत सामन्यात विजय मिळविला.
त्यापूर्वी चौथ्या फेरीत पेस-स्टेपनाक जोडीला फ्रान्सच्या निकोलस माहुत आणि मिशेल लॉड्रा या जोडीने कडवी झुंज दिली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, September 4, 2013, 12:02