Last Updated: Thursday, October 25, 2012, 20:21
www.24taas.com, कोल्हापूरकाल दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी बांग्लादेशींना हाकलवून लावण्याचा आदेश शिवसैनिकांना दिला होता. आज कोल्हापूरात 28 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय. शहरातल्या संभाजीनगर परिसरात जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणांची चौकशी केली. त्यावेळी त्यांना 28 बांगलादेशी नागरिक सापडले. तपासणी केल्यावर बांगलादेशी नागरिकांकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचं स्पष्ट झालं. या बांगलादेशींना अटक केल्यानंतर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं.
दरम्यान या प्रकरणाची माहिती कळताच शिवसैनिकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धडक मारली. शहरातल्या सर्व बांगलादेशींना शोधून त्यांना देशाबाहेर हाकलून देण्याची मागणी शिवसैनिकांनी केली.
First Published: Thursday, October 25, 2012, 20:19