हर्षवर्धन पाटील यांच्या गावातील विद्यार्थ्यांना विषबाधा, 52 school children medication containing iron in indapur

हर्षवर्धन पाटलांच्या गावातील विद्यार्थ्यांना विषबाधा

हर्षवर्धन पाटलांच्या गावातील विद्यार्थ्यांना विषबाधा

www.24taas.com, झी मीडिया, इंदापूर
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावी असलेल्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातल्या तब्बल ५० ते ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...

शासनाकडून दिल्या जाणा-या लोहयुक्त गोळ्यांच्या सेवनानं विषबाधा झाल्याचं समोर आलंय. बिहारमध्ये शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा प्रकार ताजा असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे इंदापूरसह परिसरात खळबळ उडालीय.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी या गोळ्या शास्त्रोक्त पद्धतीनं न खाल्ल्यामुळे त्यांना असा त्रास झाल्याचा दावा इथल्या वैद्यकीय अधिका-यांनी केलाय. तसंच सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगण्यात आलं...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 19, 2013, 17:40


comments powered by Disqus