Last Updated: Friday, July 19, 2013, 10:32
www.24taas.com, झी मीडिया,सोलापूरबिहारमध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा प्रकरण ताजं असतानाच सोलापुरात ५२ शाळकरी मुलांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झालाय. माळकवठेमधल्या पंचाक्षरी विद्यालयातली ही घटना आहे.
लोहयुक्त गोळ्यांमधून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येतीय.या सर्व विद्यार्थ्यांना मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्यची माहिती डॉक्टरांनी दिलीय.
माळकवठे येथील पंचाक्षरी माध्यमिक विद्यालयात बुधवारी आरोग्य खात्याने तपासणी करून विद्यार्थ्यांना लोहयुक्त गोळ्या दिल्या. विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी गोळ्या खाल्याने त्यांना मळमळणे, उलटी होणे, चक्कर येणे याचा त्रास सुरू झाला. यातील काही विद्यार्थ्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात विद्यार्थ्यांना हलविण्यात आले.
दुपारी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या रक्तवाढीसाठी लोहयुक्त गोळ्या देण्यात आल्या. मध्यान्न भोजनानंतर विद्यार्थ्यांनी गोळ्या घेतल्या. त्यानंतर त्यांना मळमळण्याचा त्रास सुरू झाला. रात्री उशिरानंतर गोळ्यांचा त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, July 19, 2013, 10:28